IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुलला संधी देण्यासाठी विराट कोहली आज कुणाला डच्चू देणार, Playing XI कशी असणार?

India’s Playing XI for 4th T20 vs England - मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना जिंकावाच लागेल आणि त्यासाठी कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) चूका टाळून काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.

India’s Playing XI for 4th T20 vs England - मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना जिंकावाच लागेल आणि त्यासाठी कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) चूका टाळून काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. पण, तीन सामन्यांत १, ०, ० अशी कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला ( Virat Kohli on KL Rahul) विराट आणखी संधी देतो का?,हे सर्वांना पाहायचे आहे.

तिसऱ्या सामन्यातही भोपळ्यावर बाद झाल्यानंतर विराटनं राहुलची पाठराखण केली होती. तो चॅम्पियन फलंदाज आहे आणि रोहित शर्माइतकाच भारतीय संघासाठी तो महत्त्वाचा आहे, असे विराट म्हणाला होता. पण, विराटच्या या मित्रप्रेमावर टीकाही झाली. सूर्यकुमार यादवला ( Suryakumar yadav) एका सामन्यानंतर त्वरित बाकावर बसवण्याचा निर्णय विराटनं घेतला होता.

मागील तीन सामन्यांत भारतीय संघानं, शिखर धवन-लोकेश राहुल, इशान किशन-लोकेश राहुल आणि रोहित शर्मा- लोकेश राहुल अशा तीन वेगवेगळ्या जोड्या सलामीला खेळवून पाहिल्या. पण, तीनही सामन्यात लोकेश राहुल अपयशी ठरूनही कायम राहिला.

आजच्या चौथ्या सामन्यात लोकेशला संधी द्यायची की आणखी एका चांगल्या फलंदाजाला खेळवायचे, याचा निर्णय विराटला घ्यायचा आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी जिंकावाच लागेल.

भारतासाठी आणखी एक डोकेदुखी म्हणजे युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal) फॉर्म. त्यानं मागील १२ ट्वेंटी-२० सामन्यांत ४३.६च्या सरासरीनं धावा दिल्या आहेत. तिसऱ्या ट्वेंटी-२०त त्यानं ४ षटकांत ४१ धावा दिल्या. त्यामुळे त्याला विश्रांती देऊन अक्षर पटेलला ( Axar Patel) संधी द्यायची का, हाही विचार विराट करत असेल.

IND vs ENG: INDIA Likely Playing XI – 4th T20 : रोहित शर्मा, लोकेश राहुल/शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल/युझवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर व भुवनेश्वर कुमार