Join us  

IND vs WI 3rd T20I Live Updates : रोहित शर्मा उर्वरित सामन्यांना मुकणार?; टीम इंडियाच्या कर्णधाराने दिले दुखापतीबाबतचे अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 7:34 AM

Open in App
1 / 5

India vs West Indies 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वादळी खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आजच्या सामन्यातही त्याने ४४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून ७६ धावा चोपल्या. भारताने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

2 / 5

रोहित शर्माची ( Rohit Sharma) दुखापत ही टीम इंडियाची चिंता वाढवणारी ठरू शकते. ५ चेंडू खेळून रोहित रिटायर्ड हर्ट झाला होता आणि सामन्यानंतर त्याने दुखापतीबाबतचे अपडेट्स दिले आहेत. भारत- वेस्ट इंडिज आता उर्वरीत दोन सामने अमेरिकेत खेळणार आहेत आणि उद्या ते रवाना होतील. ६ व ७ ऑगस्टला या लढती होणार आहेत.

3 / 5

कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स ( २०) या सलामीवीरांनी ५७ धावांची भागीदारी केली. कायले मेयर्स ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा करून बाद झाला. शिमरोन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. २०व्या षटकात अर्शदीप सिंगने सलग दोन चौकार खेचणाऱ्या रोव्हमन पॉवेलला तिसऱ्या चेंडूवर बाद केले. पॉवेलने १४ चेंडूंत २३ धावा केल्या. हेटमायरही १२ चेंडूंत २० धावा करून धावबाद झाला. विंडीजने ५ बाद १६४ धावा केल्या.

4 / 5

वेस्ट इंडिजच्या १६४ धावांना प्रत्युत्तरात रोहित शर्माने ( Rohit Sharma) चांगली सुरुवात करून दिली. पण, ५ चेंडूंत ११ धावा करून तो दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८६ धावा चोपल्या. श्रेयस २४ धावांवर, तर सूर्यकुमार ७६ धावांवर बाद झाला. भारताला ३२ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या आणि हातात ७ विकेट्स होत्या. रिषभ पंतने २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३३ धावा केल्या, दीपक हुडाने नाबाद १० धाव केल्या. भारताने १९ षटकांत ३ बाद १६५ धावा करून सामना जिंकला.

5 / 5

मधल्या फळीत गोलंदाजांनी केलेली कामगिरी निर्णायक ठरली. वेस्ट इंडिजची चांगली भागीदारी झाली होती. आम्ही परिस्थितीचा फायदा उचलला अन् फलंदाजांना बाद केले. सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा दमदार खेळ करून दाखवला. अय्यरनेही त्याला चांगली साथ दिली. माझी दुखापत बरी आहे. ३ दिवसांचा विश्रांताची कालावधी माझ्याकडे आहे आणि मी पुढील लढती खेळेन, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माबीसीसीआय
Open in App