Join us  

यशस्वी जैस्वालचे ४ मोठे रेकॉर्ड! गावस्कर, गांगुली, द्रविड यांच्याशी बरोबरी; रोहितसह रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:14 PM

Open in App
1 / 6

रोहितने आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून २००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये २००० धावा करणारा तो दुसरा सलामीवीर ठरला. वीरेंद्र सेहवागने ३९ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडलेला. रोहितला ४० डाव खेळावे लागले आणि त्याने सुनील गावस्कर ( ४३), गौतम गंभीर ( ४३) यांचे विक्रम मोडले.

2 / 6

रोहितही भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचव्या क्रमांकावर आला आहे. सचिन तेंडुलकर ( ३४३५७), विराट कोहली ( २४४६१), राहुल द्रविड ( २४२०८), सौरव गांगुली ( १८५७५), रोहित शर्मा ( १७२८१*) आणि महेंद्रसिंग धोनी ( १७२६६) असा क्रम येतो.

3 / 6

यशस्वीने कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी उपाहारापर्यंत नाबाद शतकी भागीदारी करून त्याने इतिहास रचला. जैस्वालने कसोटी क्रिकेटमधील सलग दुसऱ्या डावात ५० हून अधिक धावा केल्या. डॉमिनिका येथील पहिल्या कसोटीत त्याने १७१ धावांची खेळी केली. अशाप्रकारे, कारकिर्दीतील पहिल्या दोन डावात ५०पेक्षा जास्त धावा करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी १९३४ मध्ये दिलावर हुसेन, १९५५मध्ये कृपाल सिंग, १९७१ मध्ये सुनील गावस्कर, १९९६मध्ये सौरव गांगुली, १९९६मध्ये राहुल द्रविड, २०१०मध्ये सुरेश रैना, २०१३ मध्ये रोहित शर्मा, २०१८मध्ये पृथ्वी शॉ यांनी हा पराक्रम केला होता.

4 / 6

रोहितसोबत दुसऱ्या कसोटीत शतकी भागीदारी करून जैस्वालचे नावही रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले गेले. घराबाहेर सर्वाधिक शतकी भागीदारी करणारी ही चौथी भारतीय सलामी जोडी आहे. रोहित-यशस्वी जोडीने दुसऱ्यांदा १०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. याआधी १०७९मध्ये इंग्लंडमध्ये सुनील गावस्कर-चेतन चौहान, २००३-०४मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये वीरेंद्र सेहवाग-आकाश चोप्रा, २००६ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये वीरेंद्र सेहवाग-वसिम जाफर यांनी दोनदा शतकी सलामी दिली होती.

5 / 6

ओपनिंग जोडी म्हणून सलग इनिंग्समध्ये शतकी भागीदारीचा विचार केला तर रोहित-यशस्वी संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सुनील गावसकर-फारुख इंजिनियर (1973-74), सुनील गावस्कर-अंशुमन गायकवाड (1976), सुनील गावस्कर-अरुण लाल (1982), सदागोपन रमेश-देवांग गांधी (1999) या दोघांनीही दुसऱ्यांदा हे केले आहे. यात आघाडीवर वीरेंद्र सेहवाग-मुरली विजय (२००८-०९) यांचे नाव आहे, ज्यांनी सलामीची जोडी म्हणून सलग तीन शतकी भागीदारी केली.

6 / 6

कसोटीच्या पहिल्या दोन इनिंग्जमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वीने तिसरे स्थान पटकावले. रोहित शर्मा ( २८८), सौरव गांगुली ( २६७), यशस्वी जैस्वाल ( २२८) आणि शिखर धवन ( २१०) असा क्रम येतो.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मायशस्वी जैस्वाल
Open in App