तिलक वर्माने मोठा विक्रम नोंदवला; रोहित शर्मानंतर असा पराक्रम करणारा दुसरा युवा ठरला

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२०तही वेस्ट इंडिजने बॅकफूटवर फेकले आणि ७ बाद १५२ धावांवर रोखले.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२०तही वेस्ट इंडिजने बॅकफूटवर फेकले आणि ७ बाद १५२ धावांवर रोखले. तिलक वर्मा ( Tilak Varma) याच्या अर्धशतकाने आज मोठा विक्रम नोंदवला आणि थेट रोहित शर्मानंतर दुसरा भारतीय ठरला.

शुबमन गिल ( ९), सूर्यकुमार यादव ( १) आणि संजू सॅमसन ( ७) यांनी आज पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. इशान २३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. तिलकसह त्याने ४२ धावांची भागीदारी केली. तिलकने ३९ चेंडूंत पहिले अर्धशतक पूर्ण केले.

तिलकला ५१ धावांवर ( ४१ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) झेलबाद केले. हार्दिकसह त्याने २७ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. हार्दिक ( २४ ) आणि अक्षर पटेल ( १४) यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रवी बिश्नोई ( ८) व अर्शदीप सिंग ( ६) यांनी संघाला ७ बाद १५२ धावांपर्यंत पोहोचवले.

तिलक वर्माने पहिल्या ट्वेंटी-२०त २२ चेंडूंत ३९ धावा केल्या होत्या आणि आज त्याने ४१ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. भारतासाठी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०व्या वर्षी अर्धशतक झळकावणारा तो रोहितनंतर दुसरा फलंदाज ठरला.

तिलक वर्माने आज रिषभ पंत व रॉबिन उथप्पा यांचा विक्रम मोडला.