Pink Ball Day Night Test, IND vs SL 2nd Test: डे-नाईट टेस्टमध्ये कशी आहे Rohit Sharma च्या Team India ची कामगिरी? किती सामने खेळले अन् किती जिंकले?

भारताची डे-नाईट कसोटीतील विजयाची टक्केवारी ५० टक्क्यांहून जास्त

Pink Ball Day Night Test, IND vs SL 2nd Test: भारतीय संघ आजपासून श्रीलंकेविरूद्ध गुलाबी चेंडूने डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील ही दुसरी कसोटी असून बंगळुरूच्या मैदानावर हा खेळ रंगणार आहे.

भारताने आतापर्यंत तीन डे-नाईट सामने खेळले आहेत. त्यापैकी २ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे, तर एका सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहेत. श्रीलंकेचं रेकॉर्डदेखील अगदी भारतासारखंच आहे.

IND vs BAN (2019): भारताने पहिली डे-नाईट कसोटी कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळली होती. २०१९ मध्ये बांगलादेशच्या संघाविरूद्ध खेळलेली कसोटी भारताने एक डाव आणि ४६ धावांनी जिंकली होती.

पहिली दिवस-रात्र कसोटी चाहत्यांच्या चांगलीच लक्षात राहिली असेल. कारण या कसोटीत विराटने त्याचं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७०वं शतक झळकावलं होतं. त्यानंतर त्याला आतापर्यंत शतक ठोकता आलेलं नाहीये.

IND vs AUS (2020): भारताने दुसरी डे-नाईट कसोटी ऑस्ट्रेलियात अडलेड येथे खेळली. २०२० साली झालेल्या या कसोटी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून सहज पराभूत केलं होते.

IND vs ENG (2021): टीम इंडियाने डे-नाईट कसोटीत इंग्लंडलाही पराभवाची धूळ चारली आहे. अहमदाबाद येथे २०२१मध्ये झालेल्या कसोटी भारताने इंग्लंडवर १० गडी राखून विजय मिळवला होता.