IND vs SL 1st T20I: युझवेंद्र चहलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय गोलंदाज

IND vs SL 1st T20I Live Updates : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल याच्याकडे नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल याच्याकडे नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

युझवेंद्र चहने या मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये ४ विकेट्स टिपले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरणार आहे.

टी-२० मध्ये सध्या भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आहे. त्याने भारतीय संघाकडून खेळतान ९० बळी टिपले आहेत. तर युझवेंद्र चहलच्या नावावर टी-२० मध्ये ८७ विकेट्स आहेत.

भुवनेश्वर कुमारला या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा विक्रम मोडण्याची चांगली संधी युझवेंद्र चहलकडे आहे.

त्याबरोबरच युझवेंद्र चहलने या मालिकेत एकूण ५ विकेट्स मिळले तर तो टी-२० क्रिकेटमध्ये ३०० बळी टिपणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरू शकतो. यामध्ये सर्व प्रकराचे टी-२० सामने समाविष्ट आहेत. चहलने आतापर्यंत २६० टी-२० सामन्यांमध्ये २९५ बळी टिपले आहेत.

टी-२० प्रमाणेच वनडे क्रिकेटमध्येही युझवेंद्र चहलची कामगिरी सुरेख झाली आहे. त्याने आतापर्यंत ७० वनडेंमध्ये ११८ बळी टिपलेले आहेत. .