5 Big reasons of India series defeat : भारतीय संघाची कसोटी मालिका विजयाची पाटी कोरी का राहिली?; जाणून घ्या पाच महत्त्वाची कारणं

Series defeat for India in South Africa - भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आलं.

Series defeat for India in South Africa - भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आलं. २९ वर्षांत भारताला येथे एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती, परंतु यावेळेस तो इतिहास बदलेल अशी खात्री होती. मात्र, २००६-०७च्या मालिकेत राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली जे घडलं, तेच आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली घडलं. १-० अशी आघाडी असूनही भारताला कसोटी मालिका १-२ अशी गमवावी लागली.

फलंदाजांचे अपयश हे या कसोटी पराभवामागचं महत्त्वाचं कारण आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या अपयशानं भारताची फलंदाजीची फळी कमकुवत झाली. लोकेश राहुल व रिषभ पंत ही या मालिकेतील सकारात्मक बाब म्हणता येईल, परंतु त्याचवेळी केवळ गोलंदाजांवर अवलंबूत राहता येणार नाही, याचीही जाण करून दिली.

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. पुजारा आणि रहाणे यांना या मालिकेत अनुक्रमे १३६ व १२४ धावा करता आल्या. या दोघांनी दुसऱ्या कसोटीत प्रत्येकी अर्धशतक झळकावलं, परंतु भारताला विजय मिळवून देण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला या दौऱ्यावर मोठी खेळी करता आली नाही. मागील दोन वर्षांपासून त्याला कसोटीत एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यानं तिसऱ्या कसोटीत ७९ धावांची चांगली खेळी केली आणि त्याला दोन कसोटींत ४०+ च्या सरासरीनं १६१ धावा करता आल्या. त्यात दुसऱ्या कसोटीत कंबरेत उसणं भरल्यानं त्याला मुकावे लागले.

श्रेयस अय्यर सारख्या युवा खेळाडूला संधी का दिली गेली नाही, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत त्यानं दमदार शतक व अर्धतक झळकावले. पण, अनुभवी खेळाडूंच्या नावाखाली आफ्रिका दौऱ्यावर अय्यरला प्रेक्षक बनवून ठेवलं.

बीसीसीआय विरुद्ध कोहली या ड्राम्याचे पडसादही या मालिकेवर दिसले. वन डे संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी केल्यानंतर ज्या प्रकारे विराट पत्रकारांना सामोरे गेला, त्यानं या वाद समोर आला. त्यात रोहित शर्माची अनुपस्थितीनं कसोटीत सलामीचा प्रश्न उद्भवला.

या मालिकेत फलंदाजांचे अपयश हे पराभवामागचं प्रमुख कारण ठरलं. लोकेश राहुलनं ३७.६६च्या सरासरीनं २२६ धावा केल्या. त्यानंतर रिषभ पंत ( १८६ धावा, ३७.२० सरासरी), मयांक अग्रवाल ( १३५ धावा, २२.५ सरासरी), विराट कोहली ( दोन कसोटी, १६१ धावा, ४०.२५ सरासरी), चेतेश्वर पुजारा ( १२४ धावा व २०.६६ सरासरी) आणि अजिंक्य रहाणे ( १३६ धावा व २२.६६ सरासरी) अशषी कामगिरी राहिली.