IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : भारतानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'ALL OUT' होण्याचा अजब विक्रम नोंदवला, जगातील असा एकमेव संघ ठरला

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : ४ बाद ५८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाला रिषभ पंत व विराट कोहली या जोडीनं सावरलं

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : ४ बाद ५८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाला रिषभ पंत व विराट कोहली या जोडीनं सावरलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी ९४ धावांची भागीदारी केली आणि ही जोडी सॉलिड दिसत होती.

पण, लुंगी एनगिडीनं घात केला अन् विराटला माघारी पाठवलं. बघता बघता भारताचे तळाचे फलंदाज माघारी जात होते, परंतु रिषभ पंत अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. जसप्रीत बुमराहच्या विकेटनं भारताच्या दुसऱ्या डावाचा शेवट झाला अन् टीम इंडियाच्या नावावर 'ALL OUT' होण्याचा अजब विक्रम नोंदवला गेला.

लोकेश राहुल ( १०), मयांक अग्रवाल ( ७), चेतेश्वर पुजारा ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( १) हे माघारी परतल्यानं भारताची अवस्था ४ बाद ५८ अशी झाली होती. पण, रिषभ व विराटनं टीम इंडियाचा डाव सावरला.

लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला. १४३ चेंडूंत २९ धावा करणारा विराट कोहली परतला माघारी परतला अन् रिषभ पंतसोबतची ९४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विराट माघारी परतला अन् भारताची गाडी घसरताना दिसली. आक्रमक मोडमध्ये असलेल्या रिषभला मग बचावात्मक खेळ करावा लागला.

एका बाजूनं तो डाव सावरून होता, परंतु समोर विकेट पडल्या. आर अश्विन ( ७), शार्दूल ठाकूर (५) व उमेश यादव (०) हे झटपट माघारी परतले. ८८ व ९४ धावांवर असताना रिषभला जीवदान मिळालं. रिषभनं १३१ चेंडूंत शतक पूर्ण केलं.

जसप्रीत बुमराह ( २) बाद झाला अन् भारताचा दुसरा डावही आटोपला. भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मार्को येनसन ( ४-३८), कागिसो रबाडा ( ३-५३) आणि लुंगी एनगिडी ( ३-२१) यांनी सुरेख कामगिरी केली.

या सामन्यात भारताच्या दोन्ही डावातील २० विकेट्स या झेलबाद होऊन पडल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका कसोटीत एकाच संघाच्या २० विकेट्स या झेलबाद होऊन पडल्या आहेत. India became the first team to lose all 20 wickets to catches in Test history.