नववर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाची 'अग्निपरीक्षा', नवा इतिहास रचण्याचे मोठे आव्हान

India vs South Africa Test Series: सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. ३२ वर्षांत एकदाही भारताला आफ्रिकेच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. सलामीच्या सामन्यात देखील याचाच प्रत्यय पाहायला मिळाला अन् भारताचा दारूण पराभव झाला.

भारताला आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत ठेवण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे.

लाजिरवाणा विक्रम मोडीत काढण्याच्या इराद्याने टीम इंडिया केपटाउन कसोटीसाठी मैदानात उतरेल. खरं तर या मैदानावर भारताच्या दिग्गजांनाही मोठी खेळी करता आली नाही.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देखील केपटाउनच्या मैदानात शतक झळकावता आले नाही. पण, मागील वर्षी रिषभ पंतने शतकी खेळी करून ११ वर्षांचा दुष्काळ संपवला.

यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०११ मध्ये शतक झळकावण्याची किमया साधली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३२ वर्षांपासून कसोटी मालिका होत आहेत, ज्यामध्ये सातवेळा भारताने आफ्रिकेच्या धरतीवर ही मालिका खेळली आहे.

भारताला दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर नेहमीच कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागला आहे. आतापर्यंत एकदाही टीम इंडियाला आफ्रिकेला त्यांच्यात घरात जाऊन पराभूत करता आले नाही.

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. यजमान संघाने सलामीचा सामना जिंकून ३२ वर्षांची परंपरा कायम ठेवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. खरं तर आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड ठोठावला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या १० टक्के दंड भरावा लागणार आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील दोन गुण देखील कमी झाले आहेत.

भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात लोकेश राहुल (१०१) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर दुसऱ्या डावात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवताना (७६) धावा केल्या. पण, 'विराट' खेळी सुरू असताना दुसरीकडे भारताच्या एकाही खेळाडूला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही.

यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतल्यावर भारतीय संघावर दबाव वाढला होता. विराट कोहलीने अखेरपर्यंत संघर्ष केला पण टीम इंडियाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या ३४.१ षटकांत १३१ धावांवर सर्वबाद झाला.