IND vs PAK मॅचमध्ये रंगली 'या' मिस्ट्री गर्लची चर्चा; जाणून घ्या कोण आहे ही सौंदर्यवती?

Mystery Girl in IND vs PAK, Champions Trophy 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्याची चर्चा रंगलीच पण त्यासोबतच या तरुणीची चर्चा रंगली

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला.

या सामन्यात एका तरुणीचे स्टेडियममधील फोटो व्हायरल झाले आणि तिच्या सौंदर्याची चर्चा रंगलीय. जाणून घ्या या मिस्ट्री गर्लबद्दल...

रिचा रवी सिन्हा ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील तिच्या कामासाठी ओळखली जाते.

रिचाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात म्युझिक व्हिडिओंतील अभिनयाने केली आणि मग ब्युटी कॉन्टेस्टमधून ती प्रसिद्धीझोतात आली.

ती निविन पॉलीसोबत संपूर्ण भारतात 'द नॉट' आणि 'ऑन माय टर्म्स' नावाच्या लघुपटासह विविध प्रकल्पांमध्ये काम करत आहे.

अभिनय आणि कला क्षेत्रातील प्रशिक्षण घेतलेल्या रिचाने मुंबई आणि लंडनमधील प्रसिद्ध मार्गदर्शकांकडून ट्रेनिंग घेतलं आहे.

एमएमए, जिम्नॅस्टिक्स आणि नृत्य या विषयांमध्ये तिने विशेष प्राविण्य मिळवले असून ती यात क्षेत्रातही कार्यरत आहे.

अभिनयक्षेत्रातील एक उदयोन्मुख कलाकार म्हणून ती सातत्याने चांगली कामगिरी करतेय आणि सिनेमाप्रति असलेली आवड जोपासतेय.

रिचा आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करू इच्छित असल्याचे तिने वेळोवेळी सांगितले आहे.

(फोटो सौजन्य- रिचा सिन्हा Richa Sinha Instagram)