IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

Jasprit Bumrah Sunil Gavaskar IND vs PAK Asia Cup 2025 : भारताने पहिल्या फेरीत पाकिस्तानला अतिशय सहज पराभवाचं पाणी पाजलं होतं

भारतीय क्रिकेट संघाने आशिया कपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आता त्यांना ओमानविरुद्ध त्यांचा शेवटचा लीग सामना खेळायचा आहे.

या सामन्यापूर्वी सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला एक असा सल्ला दिला आहे की ज्याने पाकिस्तानी संघाची चांगलीच लाज निघाली आहे.

सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहचा वापर फक्त महत्त्वाच्या सामन्यांमध्ये करण्याचा सल्ला दिला आहे.

जसप्रीत बुमराहला ओमान आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांसाठी विश्रांती घेऊ द्या, असा सल्ला सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला दिला आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्धच्या सुपर फोर सामन्यांसाठी टीम इंडियाने जसप्रीत बुमराहला ताजेतवाने आणि फिट ठेवावे असे गावस्कर म्हणाले.

सुनील गावसकरांच्या या विधानाने त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या संघाला अतिशय कमकुवत संघ असल्याचे म्हणत त्यांची लाजच काढली आहे.