IND vs NZ, 3rd T20I Live : शुभमन गिलच्या नाबाद १२६ धावांनी मोडले ४ मोठे विक्रम; विराट, रैनाला मागे टाकले

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय फलंदाजांनी निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात कहर केला... शुभमन गिलने ट्वेंटी-20तील पहिले शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. भारताने ४ बाद २३४ धावांचा डोंगर उभा केला

भारतीय फलंदाजांनी निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात कहर केला... शुभमन गिलने ट्वेंटी-20तील पहिले शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. भारताने ४ बाद २३४ धावांचा डोंगर उभा केला

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून ही पाचवी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. भारताने २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ५ बाद २६० धावा केल्या होत्या. त्यानंतर ४ बाद २४४ ( वि. वेस्ट इंडिज, २०१६), ३ बाद २४० ( वि. वेस्ट इंडिज, २०१९), ३ बाद २३७ ( वि. दक्षिण आफ्रिका , २०२२) असा क्रम येतो.

शुभमन गिलने १२ चौकार व ७ षटकारांसह १२६ धावांवर नाबाद राहिला अन् भारताने ४ बाद २३४ धावा केल्या. ट्वेंटी-२० त भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विराट कोहलीचा ( १२२ वि. अफगाणिस्तान, २०२२ ) विक्रम शुभमनने मोडला.

कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक किमान एक शतक झळकाणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. सुरेश रैना, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली यांनी हा पराक्रम केला आहे.

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात युवा वयात शतक झळकाण्याचा विक्रमही शुभमनने नावावर केला. तो २३ वर्ष व१४६ दिवसांचा आहे आणि त्याने सुरेश रैनाचा ( २३ वर्ष व १५६ दिवस) विक्रम मोडला.