IND vs NZ, 2nd Test : विराट कोहली संघात परतणार, मुंबई कसोटीत दोन खेळाडूंवर टांगती तलवार; जाणून घ्या कोणाचा पत्ता कट होणार

India vs New Zealand, 2nd Test : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये अपराजित मालिका कायम राखली. कानपूर कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवणे सहज शक्य होते, परंतु न्यूझीलंडच्या तळाच्या चार फलंदाजांनी २७ षटकं खेळून काढताना सामना अनिर्णित राखला.

India vs New Zealand, 2nd Test : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये अपराजित मालिका कायम राखली. कानपूर कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवणे सहज शक्य होते, परंतु न्यूझीलंडच्या तळाच्या चार फलंदाजांनी २७ षटकं खेळून काढताना सामना अनिर्णित राखला.

दोन्ही संघ मुंबईत दुसऱ्या कसोटीसाठी दाखल होतील. या कसोटीसाठी भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीचे ( Virat Kohli) पुनरागमन होत आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमधील कुणा एकाला विराटसाठी जागा मोकळी करावी लागेल.

लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे कानपूर कसोटीत श्रेयस अय्यरला पदार्पणाची संधी मिळाली अन् त्यानं पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून संघाला सावरले. त्यानं अनेक विक्रम मोडले, परंतु विराटच्या आगमनानं त्याचे मुंबई कसोटीतील संघातील स्थान जाणार की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

शतकानंतर पुढील कसोटीत बाकावर बसवण्याची भारतीय संघातील ही पहिलीच वेळ नसेल, करूण नायरला त्रिशतकी खेळीनंतरही पुढील सामन्यात वगळले गेले होते. अशी अनेक उदाहरणं आहेत, त्यामुळे मुंबई कसोटीत श्रेयस प्लेइंग इलेव्हनमध्ये न दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

कानपूर येथे सलामीवीर शुबमन गिलनं पहिल्या डावात अर्धशतक झळकावले, मयांक अग्रवाल दोन्ही डावांत काही खास करू शकला नाही. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे हे अनुभवी खेळाडू अजूनही फॉर्माशी झगडत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत या दोघांना बसवून नव्या खेळाडूंना संधी द्या अशी मागणी सोशल मीडियावर सुरू आहे.

विराट कोहलीच्या पुनरागमनानं मधल्या फळीतील एकाला बाकावर बसवले जाऊ शकते. पुजारा व रहाणे यांचा फॉर्म चिंताचे विषय असला तरी ते दोघंही सीनियर खेळाडू आहेत. रहाणे उपकर्णधार असल्यानं त्याला हटवणे चुकीचे ठरेल आणि अशात कदाचित पुजाराला बाहेर बसवले जाऊ शकते किंवा श्रेयसलाही डच्चू मिळू शकतो.

वृद्घीमान सहा दुखापतग्रस्त झाल्यामुळे केएस भारत ( KS Bharat) मुंबई कसोटीत पदार्पण करण्याची शक्यता आहे. तो आल्यास मयांकच्या जागी त्याला सलामीला पाठवून विराट मधल्या फळीत खेळू शकतो. अशात पुजारा, रहाणे व अय्यर या तिघांनाही संघात कायम राखता येऊ शकते.

संभाव्य संघ - मयांक अग्रवाल/ केएस भारत, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, रवींद्र जडेजा, उमेश यादव