Join us  

IND vs NZ, 2nd T20I Live Updates : रोहित शर्माचा भीमपराक्रम, लोकेश राहुलसोबत मोडले अनेक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 11:21 PM

Open in App
1 / 7

न्यूझीलंडनं ६ बाद १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं कोणतीच कसर सोडली नाही. या जोडीनं न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलग पाच सामन्यांत ५०+ भागीदारी करण्याचा भारतीय जोडीचा पहिला मान त्यांनी पटकावला.

2 / 7

ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारी ही दुसरी भारतीय दोडी ठरली. कॅलेंडर २०२१ वर्षात त्यांची ही पाचवी ५०+ धावांची भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन व रोहित शर्मा यांचा २०१८चा विक्रम मोडला.

3 / 7

रोहित शर्मानं या सामन्यात ४५० आंतरराष्ट्रीय षटकाराचा विक्रम पूर्ण करताना पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. रोहितनं ४०४ डावांमध्ये हा पराक्रम केला, तर आफ्रिदीला ४८७ डाव खेळावे लागले. ख्रिस गेल ( ५५३) व आफ्रिदी ( ४७६) यांच्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकारांमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.

4 / 7

लोकेश व रोहित यांची ११७ धावांची भागीदारी टीम साऊदीनं संपुष्टात आणली. लोकेश ४९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६५ धावांवर झेलबाद झाला. रोहित पुल शॉट मारून षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. वेंकटेश अय्यरला आज बढती मिळाली आणि तो संयमी खेळ करताना दिसला.

5 / 7

रोहितचे हे ट्वेंटी-२०तील २९वे अर्धशतक ठरले आणि त्यानं विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. टीम साऊदीनं रोहितची विकेट घेतली. तो ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला.

6 / 7

भारताला १८ चेंडूंत ११ धावा करायच्या होत्या.१८व्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या जिमी निशॅमच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग षटकार खेचून भारताला ७ विकेट्स व १६ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

7 / 7

रोहित शर्माची २५ अर्धशतकं ही भारताच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली आणि ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. भारताच्या 'मिशन २०२२' ची सुरुवात मालिका विजयानं, सलग पाचवी ट्वेंटी-२० मालिका खिशात

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्मालोकेश राहुल
Open in App