Join us  

IND v NZ Test Match: तासभर फलंदाजी करतो आणि काही नाही, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा पुजारावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 10:07 AM

Open in App
1 / 12

सध्या चेतेश्वर पुजारा आपल्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला दमदार कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पुजारानं पहिल्या डावात २६ आणि दुसऱ्या डावात २२ धावा केल्या होत्या

2 / 12

त्याच्या फलंदाजीवरून पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बच्चनं मोठं वक्तव्य केलं आहे. पुजारा सामन्या पॉझिटिव्ह दिसला, परंतु काइल जॅमिसनच्या चेंडूवर त्यानं दुसऱ्या डावात एक चूक केली असं बट्ट म्हणाला. बट्टनं आपल्या युट्यूब चॅनलवरून त्याच्या फलंदाजीवर वक्तव्य केलं.

3 / 12

'मला वाटत नाही, पुजाराला कोणतीही तांत्रिक समस्या भेडसावत आहे. त्यानं इंग्लंडमध्येही चांगल्या धावा केल्या. परंतु जेव्हा तो आपल्या आवडीनं खेळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या चेंडूवर जोरदार फटका मारता येत असेल तरी तो डिफेन्ससाठी खेळतो. तो एका तासापेक्षा अधिक फलंदाजी करतो, परंतु काही करत नाही,' असं बट्ट म्हणाला.

4 / 12

त्यानं रविवारी ३३ चेंडूंचा सामना करत २२ धावा केल्या. तेव्हा तो पॉझिटिव्ह दिसला. त्यानं यापेक्षा जास्त धावा करण्यासाठी ७० चेंडूंचा सामना केला. पुजाराला शॉर्ट बॉल खेळण्याची गरज नव्हती परंतु जेमिसन तसंच करतो. फलंदाज आपली गती आणि उंचीमुळे अशा चुका करतो, असंही तो म्हणाला.

5 / 12

शुभमन गिलचाही खेळ चांगला नव्हता. तो शॉर्ट बॉलची अपेक्षा करत होता आणि लेंखवाले चेंजूही त्याप्रकारेच खेळत होता, असं बट्टनं आपल्या युट्यूब व्हिडीओत सांगितलं. पहिल्या सामन्यात दोन्ही डावांमध्ये जेमिसननं शुभमन गिलला बाद केलं.

6 / 12

गिलनं पहिल्या डावात ५२ तर दुसऱ्या डावात १ धाव केली. 'शुभमन गिलची टेक्निक खुप चांगली आहे असं वाटत होतं. परंतु मानसिकरित्या तो आणखी कशाची अपेक्षा करत आहे असं वाटतं. तो शॉर्ट पिच बॉल्सची अपेक्षा करत होता असं त्याचा खेळ पाहून वाटलं,' असंही त्यानं नमूद केलं.

7 / 12

पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये फलंदाज श्रेयस अय्यरनं उत्तम कामगिरी करत संधीचं सोनं केलं. पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटीत मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, भारताचा निम्मा संघ ५१ धावांवर माघारी पाठवून न्यूझीलंडनं यजमानांना दणका दिला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. पण, पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) पुन्हा टीम इंडियाचा डाव सावरला अन् मोठा पराक्रम केला.

8 / 12

रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल ( ५२) आणि श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले. टीम साऊदीनं ६९ धावा देताना ५ बळी टिपले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. पण, तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलनं त्यांना बॅकफूटवर फेकले. यंग ८९ आणि लॅथम ९५ धावांवर बाद झाले. त्यांच्यानंतर कायले जेमिन्सन ( २३) हा किवींकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अक्षर पटेलनं ६२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ८२ धावांत ३ बळी टिपले.

9 / 12

भारताच्या दुसऱ्या डावात शुबमन गिल ( १) दुसऱ्याच षटकात जेमिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा ही जोडी सांभाळेल असे वाटत होते, परंतु त्यांनी पुन्हा निराश केलं. कायले जेमिन्सननं चौथ्या दिवसाची पहिली विकेट घेतली ती पुजाराची. पुजारा २२ धावांवर बाद झाला. अजाझ पटेलनं कर्णधार अजिंक्यला ( ४) पायचीत केले. त्यानंतर टीम साऊदीनं सलामीवीर मयांक अग्रवालला ( १७) आणि रवींद्र जडेजाला ( ०) बाद करून टीम इंडियाचा निम्मा संघ ५१ धावांवर माघारी पाठवला.

10 / 12

आर अश्विन व श्रेयस अय्यर या जोडीनं खिंड लढवताना संघाच्या खात्यात ५२ धावांची भर घातली. जेमिन्सननं ही जोडी तोडताना अश्विनला ( ३२) बाद केलं. पण, श्रेयस आत्मविश्वासानं खेळला. त्यानं दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून मोठा पराक्रम केला.

11 / 12

कसोटी पदार्पणात १५०+ धावा करणाता तो लाला अमरनाथ ( १९३३), शिखर धवन ( २०१३) व रोहित शर्मा ( २०१३) यांच्यानंतरचा चौथा भारतीय फलंदाज ठरला. तर कसोटी पदार्पणात दोन्ही डावांत ५०+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्यानं दिलवर हुसैन ( वि. इंग्लंड, १९३४) व सुनील गावस्कर ( वि. वेस्ट इंडिज, १९७१) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

12 / 12

पदार्पणाच्या सामन्यात शतक व अर्धशतक झळकावणारा श्रेयस हा पहिला भारतीय ठरला आहे. त्यानं पहिल्या डावात १०५ धावा केल्या होत्या.

टॅग्स :चेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणेपाकिस्तान
Open in App