IND vs NZ: गिल-अय्यर संघात, 'या' ४ स्टार खेळाडूंना बाहेर बसावं लागणार, अशी असेल Playing XI

Team India Playing XI Prediction IND vs NZ 1st ODI: यशस्वी जैस्वालसह आणखी तीन जण नाईलाजाने संघाबाहेर होणार...

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना आज वडोदरा येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ काय असेल, समजून घेऊया.

कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर दोघेही गंभीर दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन करत आहेत. त्याचसोबत टॉप ४ मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघे असतील.

अतिशय चांगली कामगिरी करूनदेखील सलामीवीर यशस्वी जैस्वालला संघाबाहेर बसावे लागेल. गिल आणि रोहित यांच्यापैकी कुणाला दुर्दैवाने दुखापत झाली तर मात्र जैस्वालला संधी दिली जाऊ शकते.

यष्टिरक्षक ऋषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्यामुळे केएल राहुल पाचव्या स्थानी खेळेल. अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांचे संघात स्थान जवळपास निश्चित आहे.

प्रसिद्ध कृष्णा आणि नितीश कुमार रेड्डी दोघांना संधीची वाट पहावी लागेल. संघाने जर अष्टपैलू खेळाडू वाढवण्यासाठी केवळ दोनच वेगवान गोलंदाज खेळवायचा निर्णय घेतला तर रेड्डी संघात येऊ शकेल.

गोलंदाजीत कुलदीप यादवलाही संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज याच्यासोबत हर्षित राणाला संघात स्थान दिले जाईल असा अंदाज आहे.