Join us  

IND vs ENG, 4th T20, Rohit Sharma : इंग्लंडच्या पराभवामागे रोहित शर्माचं डोकं; शार्दूल ठाकूरला दिला मंत्र अन् टीम इंडियाची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 10:05 AM

Open in App
1 / 8

India vs England, 4th T20I : भारतीय संघानं गुरूवारी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात इंग्लंडवर ८ धावांनी विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.

2 / 8

इंग्लंडला विजयासाठी अखेरच्या २४ चेंडूंत ४६ धावांची गरज असताना कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मैदानाबाहेर गेला. त्यानंतर सामन्याची सूत्र रोहित शर्मानं ( Rohit Sharma) सांभाळली अन् त्यानंतर टीम इंडियानं मुसंडी मारली.

3 / 8

१५ व्या षटकात विराट कोहली दुखापतग्रस्त होऊन माघारी परतला. १५ व्या षटकात राहुल चहरनं सामन्याला कलाटणी दिली. त्यानं बेअरस्टोला ( २५) झेलबाद करून माघारी पाठवले आणि स्टोक्ससोबतची ६५ ( ३६ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. सुंदरनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथमच ४०+ धावा दिल्या.

4 / 8

१७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. बेन स्टोक्स २३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार मारून ४६ धावांवर माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर इयॉन मॉर्गनही ( ४) माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडला कमबॅक करता आले नाही.

5 / 8

शार्दूल ठाकूरनं त्याच्या कोट्यातील ४ षटकांपैकी दोन षटकं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टाकली आणि त्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण, रोहितनं त्याच्या हाती १७वे षटक दिलं अन् त्यात त्यानं दोन विकेट्स घेतल्या. रोहितनं त्याला मंत्र दिला. त्यानं अखेरच्या षटकात १ विकेट घेतली. शार्दूलनं ४ षटकांत ४२ धावांत तीन विकेट्स घेतल्या.

6 / 8

शार्दूल हा २०२०नंतर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २० विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे. शार्दूलनं सामन्यानंतर यशाचं श्रेय रोहित शर्माला दिलं. तो म्हणाला,रोहितनं मला सांगितलं की, तुझी जी स्टाईल आहे, तशीच गोलंदाजी कर. मैदानाच्या एका बाजूची बाऊंड्री लहान आहे आणि हे लक्षात ठेऊन गोलंदाजी कर, असंही त्यानं सांगितले. मी त्याच्या या प्लानची अंमलबजावणी केली.'

7 / 8

इंग्लंडला विजयासाठी २३ धावांची गरज असताना जोफ्रा आर्चर व ख्रिस जॉर्डन हे गोलंदाज खेळपट्टीवर होते. शार्दूल ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर १ धाव घेत जॉर्डननं आर्चरला स्ट्राईक दिली. त्यानंतर आर्चरनं चौकार व षटकार खेचून सामना ३ चेंडूत १२ धावा असा आणला. त्यानंतर शार्दूलनं सलग दोन चेंडू व्हाईड फेकले आणि इंग्लंडला विजयासाठी ३ चेंडूंत १० धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर १ धाव घेतल्यानं जॉर्डन स्ट्राईकवर गेला. पाचव्या चेंडूवर जॉर्डनला बाद करण्यात शार्दूलला यश आलं. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एकच धाव मिळाली.

8 / 8

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माशार्दुल ठाकूर