IND vs ENG, 1st ODI, Virat Kohli : विराट कोहलीचा फॉर्म 'त्या' लकी गोष्टीमुळे परतला?, पहिल्या वन डेत सिक्रेट ओपन

India vs England, 1st ODI : रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करून दिली. रोहित माघारी परतल्यानंतर धवननं कर्णधार विराट कोहलीसह इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. धवनला मोइन अलीनं जीवदान दिलं. यावेळी विराटची लकी गोष्ट समोर आली.

IND vs ENG, 1st ODI : इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियानं पहिल्या वन डे त कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांना पदार्पणाची संधी दिली आहे. ( Prasidh Krishna & Krunal Pandya to debut for India).

पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर कृणालनं ती आकाशाच्या दिशेनं उंचावली आणि वडिलांना श्रद्धांजली वाहिली. हार्दिक व कृणाल यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. वन डे त पदार्पण करताना कृणाल भावनिक झालेला पाहायला मिळाला. युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली आहे, तर रिषभ पंतला वगळून लोकेश राहुल यष्टिंमागे दिसणार आहे.1st odi ind vs eng Live Score, 1st odi ind vs eng Live updates

रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, तरीही त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सनं ही ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या.

रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीनं सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांचा सलामीवीर म्हणून सर्वाधिकवेळा ५०+ धावांचा विक्रम मोडला. रोहित व शिखर यांनी ३१ वेळा सलामीवीर म्हणून ५०+ धावांची भागीदारी केली. ( Rohit Sharma and Shikhar Dhawan Surpassed Sachin Tendulkar and Virender Sehwag As most 50+ runs opening partnership for india. Rohit and Shikhar 31* times)

रोहित माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. यावेळी विराट कोहलीनं टीम इंडियाच्या जर्सीच्या आत घातलेला लाल रंगाचा टी शर्ट चर्चेत आला आहे. विराट कोहलीही फॉर्माशी संघर्ष करत होता आणि त्यानं ट्वेंटी-२० मालिकेत जेव्हा पासून हे लाल टी शर्ट विराट कोहलीचे गुड लक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विराटनं ट्वेंटी-२० मालिकेत सर्वाधिक २३१ धावा कताना मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार जिंकला. त्या मालिकेत त्यानं ७३*, ७७* आणि ८०* धावांची खेळी केली होती. त्यामुळे विराट ते लाल टी शर्ट घालून मैदानावर उरतला आहे आणि पहिल्या वन डेतही त्याचा फॉर्म काम राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विराट कोहली व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. धवननं वन डेतील ३१वे अर्धशतक पूर्ण करताना दमदार खेळ केला. विराटनेही अर्धशतक पूर्ण केलं. त्याचे हे वन डेतील ६१ वे अर्धशतक ठरले.