IND vs BAN : विरोधकांचे आंदोलन अन् भारत-बांगलादेश मालिकेत झाला बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

India vs Bangladesh Series : भारतीय संघ तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. पण, या दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच विरोधरांच्या आंदोलनाची झळ पोहोचली आहे

India vs Bangladesh Series : न्यूझीलंडं दौऱ्यानंतर भारतीय संघ तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. पण, या दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच विरोधरांच्या आंदोलनाची झळ पोहोचली आहे आणि मालिकेतील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

२०१५नंतर भारतीय संघ प्रथमच बांगलादेश दौऱ्यावर जात आहेत आणि ४ डिसेंबरला वन डे मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या मालिकेतील तीनही वन डे सामने ढाका येथे खेळवले जाणार होते, परंतु आता त्यात बदल केला गेला आहे.

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल

भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव

वन डे मालिकेत १० डिसेंबरला होणारी तिसरी लढत ढाका येथून चित्तगांव येथे होणार आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीकडून ढाका येथे त्याचदिवशी आंदोलन केले जाणार असल्याने हा निर्णय घेतला गेला आहे.

चित्तगांव येथे एक कसोटी लढत होणार होती, परंतु आता तिथे वन डे सामनाही होईल, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अधिकारी जलाल युनूस यांनी सांगितले. १४ ते १८ डिसेंबर ला चित्तगावं येथे पहिली कसोटी आणि २२ ते २६ डिसेंबरला ढाका येथे दुसरी कसोटी होईल.

४ डिसेंबर, ७ डिसेंबर ( ढाका) आणि १० डिसेंबर ( चित्तगांव) येथे वन डे सामने होतील. भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता हे सामने सुरू होतील, तर कसोटी सामने सकाळी ९.३० वाजल्यापासून खेळवण्यात येतील.