IND vs AUS : जिथं सचिन ठरला फुसका बार; तिथं धोनी-कोहलीनं केलाय धमाका! इथं पाहा खास रेकॉर्ड

किंग कोहलीच्या निशाण्यावर आहे MS धोनीचा विक्रम

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना ॲडलेडच्या मैदानात रंगणार आहे. या मैदानात भारतीय संघाचा रेकॉर्ड उत्तम राहिला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीला माजी कर्णधार महेंद्रसिह धोनीचा या मैदानातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. इथं एक नजर टाकुयात ऑस्ट्रेलियातील या मैदानात टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर

ॲडलेडच्या मैदानात टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहे.

एमएस धोनीनं आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथील ओव्हलच्या मैदानात ६ सामने खेळले असून ३ अर्धशतकाच्या मदतीने त्याने २६२ धावा कुटल्या आहेत.

विराट कोहलीनं या मैदानात आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. २ शतकाच्या मदतीने ६१ च्या सरासरीसह त्यानं या मैदानात २४४ धावा काढल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात १९ धावा करुन धोनीला मागे टाकत विराट कोहलीला ॲडलेडचा किंग होण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. इंथं मोठ्या खेळसह तो मोठा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीरही या यादीत आहेत. या दिग्गजाने आपल्या कारकिर्दीत ॲडलेडच्या मैदानात ५८ च्या सरासहीसह २ अर्धसतकाच्या मदतीने २३२ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

मोहम्मद अझरुद्दीन याने आपल्या कारकिर्दीत या मैदानात ५ वनडे सामने खेळले आहेत. दोन अर्धशतकाच्या मदतीने माजी कर्णधाराने ६४.६६ च्या सरासरीसह १९४ धावा काढल्या आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं या मैदानात सर्वाधिक ८ सामने खेळले आहेत. पण इथं त्याला लौकिकाला साजेशा खेळ करता आलेला नाही. २०.२५ च्या सरासरीसह सचिनच्या खात्यात ॲडलेडच्या ओव्हल मैदानातील वनडेत फक्त १६२ धावांची नोंद आहे. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही.