'या' क्रिकेटपटूच्या सेलिब्रेटी पत्नी आणि मुलीने केले मोठे काम, पाहाल तर भावनिक व्हाल...

आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूंच्या मुलांचे सर्व लाड पुरवले जातात. पण ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, त्यांना आनंद कसा द्यायचा, हा विचार या क्रिकेटपटूच्या पत्नीने केला.

मुंबईतील धारावी गर्ल्स फाऊंडेशनमध्ये या क्रिकेटपटूची पत्नी आपल्या मुलीसह गेली.

या फाऊंडेशनमधील मुलींबरोबर त्यांनी आपला दिवस व्यतित केला.

या फाऊंडेशनमधील मुलींशी त्यांनी संवाद साधला.

या मुलींबरोबर त्यांनी अभ्यास केला, खेळ खेळले आणि सणही साजरा केला.

आता ही खेळाडूची पत्नी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

... तर ही क्रिकेटपटू हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा आहे. त्याचबरोबर त्यांची मुलगी हिनाया आहे.

या फाऊंडेशनच्या मुलींना आनंद देत गीता आणि हिनाया यांनी पुण्याचे काम केल्याचे मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे.