Join us  

इंग्लंडच्या लाजीरवाण्या कामगिरीचा टीम इंडियाला फायदा झाला, जाणून घ्या कसा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 5:25 PM

Open in App
1 / 7

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्या त्यांच्या अंगलट आला. गतविजेत्या इंग्लंडला पूर्ण ५० षटकंही आज खेळता आली नाहीत. बेन स्टोक्स हा त्यांच्याकडून सर्वाधिक ४३ ( ७३ चेंडू) धावा करणारा खेळाडू ठरला.

2 / 7

जॉनी बेअरस्टो ( ३०) व डेविड मलान ( २८) यांनी सुरुवात चांगली केली होती. पण, त्यांच्या फलंदाजांनी तंबूत जाण्यासाठी लाईन लावली. मोईन अली ( १५) व डेव्हिड विली ( १४) यांनीही दुहेरी आकडा गाठला, परंतु तो संघासाठी पुरेसा नाही ठरला.

3 / 7

लाहिरु कुमारा ( ३-३५), कसून रजिथा ( २-३६), पुनरागमन करणारा अँजेलो मॅथ्यूज ( २-१४) आणि महीश थीक्षणा ( १-२१) यांनी सुरेख गोलंदाजी केली. बिनबाद ४५ वरून इंग्लंडचा संपूर्ण संघ ३३.२ षटकांत १५६ धावांत तंबूत परतला. १११ धावांत इंग्लंडने १० गडी गमावले.

4 / 7

इंग्लंडची ही श्रीलंकेविरुद्ध पहिल्या इनिंग्जमधील तिसरी निचांक कामगिरी ठरली. २००३ मध्ये ते ८८ धावांवर आणि २००१मध्ये १४३ धावांवर ऑलआऊट झाले होते. १९९३ मध्ये त्यांना १८० धावांवर गुंडाळले गेले होते.

5 / 7

वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील या शतकातील ही इंग्लंडची तिसरी निचांक कामगिरी ठरली. २०१५ मध्ये ते न्यूझीलंडविरुद्ध १२३, २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५४ धावांवर ऑल आऊट झाले होते.

6 / 7

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ही तिसरी निचांक कामगिरी ठरली. काल ऑस्ट्रेलियाने ९० धावांवर नेदरलँड्सला गुंडाळले होते. त्याआधी न्यूझीलंडने चेन्नईत अफगाणिस्तानला १३९ धावांवर तंबूत पाठवले होते. बांगलादेशनेही १५६ धावांवर अफगाणिस्तानला गुंडाळले आहे.

7 / 7

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील ही वन डे क्रिकेटमधील सर्वात निचांक खेळी ठरली. १९९९मध्ये पाकिस्तानने यजमान भारताला १६८ धावांवर ऑल आऊट केले होते.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रीलंकाइंग्लंडभारत विरुद्ध पाकिस्तान