Join us  

Shikhar Dhawan Marriage life : दोन मुलांच्या आईसोबत शिखर धवननं केलं लग्न; १० वर्षांनी मोठी आहे 'गब्बर'ची पत्नी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 2:48 PM

Open in App
1 / 14

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. कोरोना व्हायरसमुळे १३ जुलैपासून सुरू होणारी ही मालिका आता १८ तारखेपासून सुरू होणार आहे.

2 / 14

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयनं श्रीलंकेत धवनच्या नेतृत्वाखाली दुसरा संघ पाठवला आहे. त्यामुळे धवनच्या नेतृत्व कौशल्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

3 / 14

दरम्यान भारताच्या या सलामीवीराच्या वैयक्तिक आयुष्याचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शिखर धवननं दोन मुलांच्या आईसोबत लग्न केलं आहे आणि धवननं पत्नीच्या पहिल्या पतीपासूनच्या दोन्ही मुलांना स्वतःचे नाव दिले आहे.

4 / 14

शिखर धवन याची पत्नी आयशा मुखर्जी ही एक किक बॉक्सर आहे आणि आजही ती फिटनेसची भरपूर काळजी घेते. 27 ऑगस्ट 1975मध्ये भारतात तिचा जन्म झाला. आयशाचे वडिल बंगाली आहेत आणि आई ब्रिटिश.. त्यामुळे आयशाकडे दोन देशांचे नागरिकत्व आहे.

5 / 14

आयशाचे आईवडिल बंगालमध्ये एकत्र काम करायचे आणि त्याच दरम्यान त्यांच्यात प्रेम झालं, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

6 / 14

आयशाच्या जन्मानंतर तिच्या आईवडिलांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. फिटनेसच महत्त्व जाणणारी आयशा किक बॉक्सर आहे.

7 / 14

आयशा ही धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे आणि धवनच्या फिटनेसची ती प्रचंड काळजी घेते. आयशाचं पहिलं लग्न हे ऑस्ट्रेलियातील एका व्यावसायिकाशी झालं होतं आणि त्यांना दोन मुली आहेत.

8 / 14

पहिल्या पतीशी नातं तुटल्यानंतर आयशा आणि धवनची फेसबूकवर मैत्री झाली आणि त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांना जोरावर नावाचा मुलगा आहे.

9 / 14

धवननं आयशाच्या दोन्ही मुलींना स्वतःचं नाव दिलं आहे. आयशा नेहमी स्पोर्ट्स लूकमध्ये दिसत आहे. लहानपणापासून तिला खेळाची आवड होती.

10 / 14

लहानपणी तिचं शारीरिक शोषण झालं होतं आणि आयुष्यातील त्या भयावह आठवणी असल्याचे, आयशानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

11 / 14

त्या प्रसंगानंतर तिनं स्वतःला अधिक कणखर केलं आणि किक बॉक्सिंग शिकली. तिनं क्रिकेट आणि फुटबॉलही खेळले आहे.

12 / 14

13 / 14

14 / 14

टॅग्स :शिखर धवनभारत विरुद्ध श्रीलंका