'मिसेस चहल'ची नवी इनिंग सुरू... धनश्री वर्माच्या ताज्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती

टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहलशी लग्न झाल्यानंतर धनश्री अधिक चर्चेत येताना दिसते

Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma:३ भारतीय संघाचा स्पिनर युजवेंद्र चहलशी लग्न केल्यापासून धनश्री वर्मा हे नाव प्रचंड चर्चेत आहे. धनश्री आणि युजवेंद्र यांचे प्रेम कोविड काळात जमले आणि त्यांनी लग्न केले.

धनश्री लग्नाआधी एक डान्सर आणि युट्यूब स्टार म्हणून लोकप्रिय होती. पण चहलशी लग्न झाल्याने ती अधिक झटपट प्रसिद्धीझोतात आली.

धनश्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आपल्या नवनव्या गोष्टींबाबत माहिती देत असते. तिच्या फॅशनची बरीच चर्चा होत असते.

धनश्री वर्मा एक उत्तम डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. RCB च्या थीम साँगला कोरियोग्राफ करण्यात तिची महत्त्वाची भूमिका होती. तसेच तिचे डान्स व्हिडीओ नेहमीच पसंतीस उतरतात.

धनश्रीने मॉडेल म्हणूनही काही जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

तशातच नुकताच धनश्रीने एक शो केला. पण विशेष बाब म्हणजे या शो मध्ये ती डान्सर म्हणून गेली नव्हती तर पॉप-सिंगर म्हणजे गायिका म्हणून स्टेजवर होती.

धनश्रीने पॉप स्टार सिंगर म्हणून डेब्यू केला. तिच्या पहिल्यावहिल्या सिंगिंग शो मध्ये धनश्रीने झक्कास लूक केला होता. नक्ष अजीजच्या बँडमधून तिने आपली नवी इनिंग सुरू केली.