भारताच्या क्रिकेटपटूबरोबर 'ही' सुंदरी करतेय सुट्टी एन्जॉय; सध्या आहेत एका मोठ्या जंगलात...

भारताचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघातील खेळाडू आपल्या गर्लफ्रेंड किंवा बायकोबरबर सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.

आज भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. तो न्यूझीलंडच्या जंगलामध्ये गेला होता. त्याचा एक फोटो सध्या चांगलाच वायरल झाला आहे.

भारताच्या काही क्रिकेटपटूंनी विरंगुळा मिळावा, यासाठी समुद्र किनाऱ्याची सफर केली होती. त्याचबरोबर काही जणांनी हॉटेलमध्ये वेळ व्यतित करणे पसंत केले होते.

भारताच्या काही क्रिकेटपटूंना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते. त्यामुळे दडपण हलके करण्यासाठी ते जंगल सफारीला जाताना दिसतात.

सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा इंग्लंडमधील विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही. काही दिवसांपूर्वी धोनी आणि त्याची पत्नी साक्षी हे एका हॉटेलमध्ये स्पॉट झाले होते.

सध्याच्या घडीला माही आणि साक्षी कान्हा अभयारण्यामध्ये फिरायला गेले आहेत. यावेळी या दोघांनी एका खास जीपमधून अभयारण्याची सफर केली.

या सफरीदरम्यान साक्षीने आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो आता चांगलेच वायरल झाले आहेत.