हिटमॅन रोहितचा सुपरहिट शो; पाहा आजचे पराक्रम

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सॉलिड सुरुवात करताना दी वॉल राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 1998मध्ये द्रविडनं केलेल्या विक्रमाची रोहितनं पुनरावृत्ती केली. येथेच तो थांबला नाही. त्यानं कसोटीत सलामीला येण्याच्या संधीचं सोनं करताना खणखणीत शतकही झळकावलं.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहितनं घरच्या मैदानावर कसोटीत सलग सहावेळा 50+ धावा केल्या आहेत. त्यानं मागील सहा डावांत 82, 51*, 102*, 65, 50*, 59*( आजची खेळी) पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली.

द्रविडनं 1997-98 या कालावधीत मायदेशात सलग सहावेळा 50+ धावा केल्या होत्या. या अर्धशतकामुळे रोहितचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि त्यानं त्याचं शतकात रुपांतर केले.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहितनं 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे.

योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : यापूर्वी शिखर धवनने 2012-13मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत 187 धावांची खेळी केली होती. लोकेश राहुलने 2015मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावा केल्या होत्या, तर पृथ्वी शॉ याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 134 धावा केल्या आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहितनं खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली, तर मयांकनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. रोहित आणि मयांक प्रथमच सलामीवीर म्हणून कसोटीत एकत्र खेळले. या जोडीनं 59.1 षटकांत 202 धावांची भागीदारी करून इतिहास घडवला. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. रोहितने 174 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकार खेचून 115 धावा केल्या, तर मयांकने 183 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा केल्या आहेत.