‘रब ने बना दी जोडी’! हार्दिक-माहिकाने शेअर केली अलिशान घरातील खास क्षणांची झलक

हार्दिक-माहिका जोडी अन् अध्यात्माची गोडी

टीम इंडियातील स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या सध्या मोठ्या सुट्टीवर आहे. पण फिल्डबाहेरील आपल्या स्वॅगमुळे तो सातत्याने चर्चेत दिसतोय.

नताशापासून विभक्त झाल्यावर हार्दिक पांड्या आणि माहिराक शर्मा जोडी जमली आहे. क्रिकेटर सातत्याने माहिकासोबतचे फोटो शेअर ही पार्टनरशिप एकदम भक्कम करण्याचे संकेत देत आहे.

त्यात आता खास फोटोंची भर पडली आहे. हार्दिक पांड्या आणि माहिका दोघांनी आपापल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून अलिशान घरातील पूजेचे खास फोटो शेअर केले आहेत.

जोडीनं पूजेला बसलेल्या या खास फोटोंमध्ये खूप काही दडलंय. हार्दिक पांड्या हा माहिकासोबत फक्त टाइमपास करत नसून त्यानं तिला दिलाची राणी करून आयुष्याची जोडीदारीण करण्याचे अगदी पक्के ठरवल्याचे दिसून येते.

पारंपारिक पोशाखातील परफेक्ट मॅचिंगसह या दोघांवर 'रब ने बना दी जोडी' हे गाणं अगदी परफेक्ट सूट होणारे आहे.

हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या या फोटोत जिममध्येही ती हार्दिकसोबत 'जिथं तू तिथं मी...' या तोऱ्यात मिरवताना दिसते.

हा फोटो क्रिकेटरच्या प्रेमाचा एक वेगळा स्वॅग दाखवणारा असाच आहे. हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड माहिकाला चक्क कडेवर घेऊन 'तुमच्यासाठी कायपण' असं म्हणत फोटोसाठी खास पोझ दिल्याचे पाहायला मिळते.

माहिकासोबत आपला बर्थडे साजरा केल्यापासून हार्दिक पांड्या सातत्याने तिच्यासोबतचे फोटो शेअर करताना पाहायला मिळत आहे.