MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?

Hardik Pandya Divorce : घटस्फोट झाल्यास हार्दिकला त्याच्या एकूण संपत्तीतील ७० टक्के हिस्सा हा नताशाला द्यावा लागणार असल्याच्या अफवा समोर येत आहेत. पण, तुम्हाला माहितीये का हार्दिक पांड्याकडे एकूण किती संपत्ती आहे?

भारताचा क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. हार्दिक आणि नताशामध्ये बिनसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नताशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पांड्या हे नाव काढून टाकल्याने हार्दिक आणि तिच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हार्दिक नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांनाही उधाण आलं आहे.

अशातच घटस्फोट झाल्यास हार्दिकला त्याच्या एकूण संपत्तीतील ७० टक्के हिस्सा हा नताशाला द्यावा लागणार असल्याच्या अफवाही समोर येत आहेत. पण, तुम्हाला माहितीये का हार्दिक पांड्याकडे एकूण किती संपत्ती आहे?

इनसाइड स्पोर्टसने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. बडोदा येथे त्याचं तब्बल ६ हजार स्के.फूटचं पेंटहाऊस आहे. याची किंमत सुमारे ३.६ कोटींच्या घरात आहे.

याशिवाय मुंबईतील वांद्रे येथे हार्दिकच्या नावावर 8BHK आलिशान फ्लॅट आहे. याची किंमत सुमारे ३० कोटी रुपये इतकी आहे.

लक्झरियस आयुष्य जगणारा हार्दिक पांड्या महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर, रोल्स रॉयल, लँबोर्गिनी, ऑडी यांसारख्या गाड्या आहेत.

हार्दिक जाहिराती आणि ब्रँड अडरोसमेंटमधूनही कोटींची कमाई करतो.

हार्दिक भारतीय क्रिकेट टीममधील अ श्रेणीतील खेळाडू आहे. बीसीसीआयकडून त्याला क्रिकेट खेळण्यासाठी वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात.

यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिकने मुंबई इंडियन्स टीमचं नेतृत्व केलं. MI च्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याला तब्बल १५ कोटी मिळाले होते.

९ वी पास असलेल्या हार्दिक पांड्याकडे एकूण ९१ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.