Hardik Pandya: कमाईच्या पिचवर हार्दिक पांड्या सुसाट; 5 वर्षात कमावले कोट्यवधी, पाहा कार कलेक्शन!

hardik pandya marriage: हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत पुन्हा लग्न केल्याने तो चर्चेत आला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत पुन्हा एकदा लग्न केले आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये झालेल्या लग्नाच्या शाही सोहळ्यात दोघांनी सातफेरे घेतले.

खरं तर 2020 मध्ये या जोडप्याचे कोर्ट मॅरेज झाले होते. सोशल मीडियावर पुन्हा लग्नाच्या बातम्या आणि फोटोंचा बोलबाला सुरू आहे. यावरूनच हार्दिक पांड्याच्या लग्झरी लाइफचा अंदाज लावला जाऊ शकतो.

हार्दिक पांड्या त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलमुळे देखील चर्चेत असतो. आता तो त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत पुन्हा लग्न केल्याने चर्चेत आला आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवर अष्टपैलू खेळी करून चाहत्यांच्या मनात जागा करणारा पांड्या कमाईच्या बाबतीतही सुसाट आहे.

स्पोर्ट्सकीडाने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याची एकूण नेटवर्थ जवळपास 11 मिलियन डॉलर (91 कोटींहून अधिक) आहे. क्रिकेट सामन्यांव्यतिरिक्त तो जाहीराती आणि सोशल मीडियाद्वारे भरपूर कमाई करतो.

हार्दिक पांड्या आताच्या घडीला भारताच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार आहे. 2016 साली ट्वेंटी-20 आणि वन डे मध्ये पदार्पण करून त्याच्या यशाची सुरुवात झाली आणि जी आजतागायत सुरू आहे.

ज्या वेगाने पांड्याची क्रिकेट कारकीर्द पुढे गेली, त्याच वेगाने त्याची कमाईही वाढत गेली. क्रिकेट हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे आणि आयपीएल आणि बीसीसीआयने दिलेल्या मानधनातूनही त्याला भरपूर पैसा मिळतो.

सुरुवातीच्या आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या हार्दिक पांड्याकडे अफाट संपत्ती आहे आणि तो त्याच्या शाही छंदांसाठीही ओळखला जातो.

रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याला एका वन डे सामन्यासाठी 20 लाख रुपये, कसोटी सामन्यासाठी 30 लाख रुपये आणि ट्वेंटी-20 सामन्यासाठी 15 लाख रुपये मिळतात.

2022 मधील आयपीएलबद्दल भाष्य केले तर, पांड्याला गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीने मानधन म्हणून 15 कोटी रुपये दिले. तर त्याची अंदाजे महिन्याची कमाई सुमारे 1.2 कोटी रुपये आहे.

हार्दिक पांड्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते असून इंस्टाग्रामवर त्याचे 24 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेक मोठमोठ्या ब्रँड्सचे प्रमोशन करून तो भरपूर पैसे कमावतो.

डिसेंबर 2022 पर्यंत हार्दिक पांड्या BoAt, Sin Denim, Gulf Oil India, Villain, Dream11, Xlerate, Souled Store, Amazon Alexa, Reliance Retail, Star Sports Monster Energy, SG Cricket यांसारख्या ब्रँड्ससोबत जोडला गेला होता.

हार्दिक पांड्याच्या लग्झरी लाइफप्रमाणे त्याचे घर देखील आलिशान आहे. 2016 मध्ये त्याने गुजरातमधील वडोदरा येथील पॉश भागात असलेल्या दिवाळीपुरा येथे सुमारे 6000 स्क्वेअर फुटांचे घर विकत घेतले होते. या आलिशान घराची किंमत 3.6 कोटी एवढी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याची विदेशात देखील संपत्ती असल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

हार्दिक पांड्याचे घर आणि स्टाइल यासोबतच त्याचे कार कलेक्शन देखील प्रभावी आहे. हार्दिक पांड्याच्या लग्झरी लाइफची झलक दाखवण्यात कार कलेक्शनची महत्त्वाची भूमिका आहे.

पांड्याच्या कलेक्शनमध्ये 6 कोटींहून अधिक किमतीची रोल्स रॉयस, अंदाजे 4 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी, ऑडी ए6, रेंज रोव्हर वोग, जीप कंपास, मर्सिडीज जी-वॅगन, पोर्शे केयेन आणि टोयोटा इटिओस यांचा समावेश आहे.