Good news for Mumbai Indians: मुंबई इंडियन्स IPL 2022 मध्ये सुरूवातीपासूनच 'कल्ला' करणार; अंबानींची मेगा ऑक्शनमधील खेळी ठरली यशस्वी!

Good news for Mumbai Indians: इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने चतुराईने खेळाडूंवर बोली लावताना मजबूत संघबांधणी केली.

Good news for Mumbai Indians: इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने चतुराईने खेळाडूंवर बोली लावताना मजबूत संघबांधणी केली. इशान किशन ( Ishan Kishan) आणि जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यांच्यासाठी मोठी रक्कम मोजल्यानंतरही MI ने काही बिग हिटर खेळाडूंना ताफ्यात घेत वर्चस्व गाजवले. आकाश व नीता अंबानी यांनी ऑक्शनमध्ये दाखवलेली चतुराई यशस्वी ठरली आहे.

ऑक्शनच्या पहिल्या दिवशी इशानचं नाव येताच मुंबईने वाटेत ती किंमत मोजली आणि दुसऱ्या दिवशी जोफ्रा आर्चरसाठी ८ कोटी ओतले. त्यात त्यांनी टीम डेव्हिडलाही घेत हार्दिक पांड्याची उणीव भरून काढली.

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज व राजस्थान रॉयल्सचा माजी जोफ्रा आर्चर याचे नाव येतात मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपये मोजले. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु त्यांच्याकडील पैसे हे फार कमी होते आणि SRH ला माघार घ्यावी लागली. जोफ्रा आर्चर यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्ससाठी दुखापतीमुळे उपलब्ध होणार नसला तरी मुंबई इंडियन्सने भविष्याचा विचार करून हा निर्णय घेता.

हार्दिक पांड्याची उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी संघात टीम डेव्हिड याला घेतले. सिंगापूरच्या या खेळाडूला RCBने मागच्या वर्षी एकाच सामन्यात खेळवले होते. त्याने आताच पाकिस्तान सुपर लीगमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे. टीम डेव्हिड असे या फलंदाजाचे नाव आहे आणि त्याने PSL मध्ये 28*(16), 71(29), 51*(19) आणि 34(18) अशी फटकेबाजी केली आहे.

मुंबई इंडियन्सने गोलंदाजी विभागात डॅनिएल सॅम्स, टायमल मिल्स व रिले मेरेडिथ यांना आपल्या ताफ्यात घेतले. जसप्रीत बुमराह, जयदेव, मुरुगन अश्विन ही फळी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे आयपीएलमधील अन्य फ्रँचायझींची झोप उडाली असताना मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी आली आहे.

टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), रिले मेरेडिथ ( १ कोटी) व डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी) हे ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून मुंबई इंडियन्ससाठी उपलब्ध असणार आहेत. पाकिस्तान दौऱ्यासाठीच्या ऑस्ट्रेलियन संघात यांची निवड झालेली नाही. हे राष्ट्रीय संघासोबत करारबद्ध नसल्यामुळेही अन्य खेळाडूंचा नियम त्यांना लागू होत नाही.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी), मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रमणदीप सिंग ( २० लाख), आर्यन जुयल ( २० लाख), रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख), अर्जुन तेंडुलकर ( ३० लाख), राहुल बुद्धी ( २० लाख).