T20 World Cup स्पर्धेत 'लिंबू टिंबू' संघाविरुद्ध सर्वात महागडे षटक टाकणारे गोलंदाज

एक नजर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात महागडे षटक टाकणाऱ्या गोलंदाजांच्या रेकॉर्डवर....

UAE विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने १० विकेट्सनी दमदार विजय नोंदवला. पण या सामन्यात गोलंदाजीवेळी पार्ट टाइम ब्रेक थ्रू स्पेशलिस्ट ग्लेन फिलिप्सनं एसोसिएट्स संघाविरुद्ध सर्वात महागडे षटक टाकले.

ICC चे नियमित सदस्य असलेल्या संघाकडून खेळताना एसोसिएट संघाविरुद्ध एका षटकात सर्वाधिक धावा खर्च करण्याचा लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावे झाला.

UAE विरुद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्सनं एका षटकात २७ धावा खर्च केल्या. यासह तो एसोसिएट्स संघाविरुद्ध सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यातील १८ व्या षटकात UAE च्या बॅटर्संनी ग्लेन फिलिप्सची चांगलीच धुलाई केली.

ग्लेन फिलिप्स हा स्फोटक फलंदाजी आणि मैदानातील अफलातून क्षेत्ररक्षणाशिवाय गोलंदाजीत मोक्याच्या क्षणी विकेट घेऊन जोडी फोडण्यात माहिर आहे. UAE विरुद्ध त्याने एक विकेट घेतली. पण २ षटकात त्याने ३० धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात फक्त ३ धावा खर्च केल्यावर त्याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात महागडे षटक टाकले.

दक्षिण आफ्रिकेच्या काइल ॲबट याने २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मुंबईतील वानखेडेच्या मैदानात अफगाणिस्तानविरुद्ध एका षटकात २२ धावा खर्च केल्या होत्या.

२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तरबेझ शम्सी याने USA विरुद्धच्या सामन्यात नॉर्थ साउंडच्या मैदानात एका षटकात २२ धावा खर्च केल्या होत्या.

या यादी इंग्लंडचा स्टार जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचंही नाव आहे. यंदाच्या हंगामातच (२०२६ टी वर्ल्ड कप) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नेपाळविरुद्ध त्याने एका षटकात २२ धावा खर्च केल्याचे पाहायला मिळाले.