Join us  

Arjun Tendulkar ने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय का घेतला? Sachin Tendulkar म्हणाला, त्याला खेळण्याची अधिक संधी मिळावी म्हणून!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 4:05 PM

Open in App
1 / 5

Sachin Tendulkar confirms son seeks NOC citing 'lack of playing time' - महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याने मुंबई संघाकडे NOC मागितल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मुंबईच्या रणजी करंडक संघाचा सदस्य असलेल्या अर्जुनने पुढच्या मोसमात गोवा संघाकडून खेळण्याची परवानगी मागितल्याचे वृत्त समोर आले अन् चर्चा सुरू झाली. अर्जुनने हा निर्णय का घेतला, याचे उत्तर सचिन तेंडुलकरने दिले.

2 / 5

अर्जुन तेंडुलकरने ३ सीजनपूर्वी भारताच्या अंडर-१९ संघाकडून श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले होते. त्यावेळी मुंबईच्या मर्यादित षटकांच्या संभाव्य संघातही त्याचा समावेश होता. अर्जुनसाठी सर्वात मोठी निराशा म्हणजे, या सीजनमध्ये त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे मुंबई संघातून वगळण्यात आले. दरम्यान, गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अर्जुन तेंडुलकरचा राज्यातील संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

3 / 5

२२ वर्षीय अर्जुनची २०२१-२२च्या रणजी करंडक स्पर्धेसाठीच्या मुंबईच्या संघात निवड झाली, परंतु त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मुंबईचे मुख्य निवड समिती प्रमुक सलिल अंकोला यांनी हा निर्णय अर्जुनच्या कारकीर्दिला मोठी भरारी देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

4 / 5

८ सप्टेंबर २०२२पासून स्थानिक क्रिकेटला सुरुवात होणार आहे, परंतु आंतर-राज्य स्पर्धेत अर्जुनला छाप पाडण्याची संधी आहे. ११ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतही त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. १३ डिसेंबरपासून रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात होतेय आणि मागील पर्वात गोवा संघाला एलिट ग्रुप डीमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

5 / 5

अर्जुनच्या निर्णयाबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला, कारकीर्दिच्या या टप्प्यावर त्याला अधिकाधिक सामने खेळण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. या निर्णयानंतर अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल, असा विश्वास आहे. क्रिकेट कारकीर्दिच्या नव्या टप्प्यात तो आहे.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरमुंबईगोवारणजी करंडक
Open in App