फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Carlos Alcaraz RCB Prize Money: अल्कराझला बक्षीस म्हणून मिळाली विराटपेक्षाही खूप मोठी रक्कम

नुकत्याच झालेल्या IPL 2025 मध्ये विराट कोहलीच्या RCB संघाने विजेतेपद मिळवले. त्यापाठोपाठ काल कार्लोस अल्काराझने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपज पटकावले.

तब्बल पाच तास आणि २९ मिनिटे चाललेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात अल्काराझने यानिक सिनरचा ४-६, ६-७, ६-४, ७-६, ७-६ असा दणक्यात पराभव केला.

सिनरने गेल्या वर्षी यूएस ओपन आणि यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. पॅरिसमध्ये त्याला ग्रँड स्लॅम विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी होती, पण ते होऊ शकले नाही.

कार्लोस अल्काराझने आतापर्यंत खेळलेल्या ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये एकदाही अंतिम फेरी गमावलेली नाही. फ्रेंच ओपनचे विजेतेपद हे त्याचे पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले.

कार्लोस अल्काराझला विजेतपदाच्या ट्रॉफीसह २.५५ दशलक्ष युरोंचे बक्षीस मिळाले. भारतीय रूपयांमध्ये बोलायचे झाल्यास, त्याला २४ कोटी ९४ लाखांचा इनाम मिळाला.

या तुलनेत, IPL 2025चे जिंकणाऱ्या RCBला २० कोटींचे बक्षीस मिळाले. हे पैसे संपूर्ण संघात वाटले जातील. पण अल्कराझने मात्र एकट्याने सुमारे २५ कोटी रुपये जिंकले.