Join us  

भारताच्या चार स्टार खेळाडूंनी अचानक घेतली निवृत्ती, पाचवा तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 1:10 PM

Open in App
1 / 5

विदर्भचा फलंदाज फैज फजलने नुकताच त्याचा शेवटचा रणजी सामना खेळला. भारताकडून एकमेव वन डे सामन्यात अर्धशतक झळकावून वेगळ्या विक्रमाची नोंद करणाऱ्या फजलने प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवले. त्याने १३८ सामन्यांत २४ शतकं व ३९ अर्धशतकांसह ९१८४ धावा केल्या. लिस्ट ए मध्ये ३६४१ व ट्वेंटी-२०त १२७३ धावा त्याने केल्या आहेत.

2 / 5

जलदगती गोलंदाज वरूण आरोन भारताकडून ९ कसोटी ( १८ विकेट्स) व ९ वन डे ( ११ विकेट्स) सामने खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहार व झारखंडकडून खेळताना त्याने ६६ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १७३ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए व ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर अनुक्रमे १३८ व ९३ विकेट्स आहेत.

3 / 5

महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ज्याची चर्चा रंगली त्या सौरभ तिवारीने युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून निवृत्ती घेतली. त्याने भारताकडून ३ वन डे सामन्यांत ४९ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ११६ सामन्यांत २२ शतकं व ३४ अर्धशतकांसह ८०७६ धावा आहेत. लिस्ट एमध्ये ४०५० धावा व ट्वेंटी-२०त ३४५४ धावा त्याने केल्या आहेत.

4 / 5

मनोज तिवारीने २००८ साली भारतीय संघाकडून पदार्पण केले आणि त्याने ७ वर्षांत १२ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामने खेळले. डिसेंबर २०११ मध्ये त्याने चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १०४ धावा करत आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिवारीने १४८ सामन्यांत ३० शतकं व ४५ अर्धशतकांसह आणि नाबाद ३०३ धावांच्या वैयक्तिक खेळीसह एकूण १०१९५ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेट व ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर अनुक्रमे ५५८१ व ३४३६ धावा आहेत.

5 / 5

भारताचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीही प्रथम श्रेणी क्रिकेटमधून या रणजी करंडक स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर करणार आहे. त्याने भारताकडून १२ वन डे ( १९ विकेट्स ) व २ ट्वेंटी-२० ( ३ विकेट्स) सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणीत त्याच्या नावावर ९५ सामन्यांत २८१ विकेट्स आहेत. लिस्ट ए व ट्वेंटी-२०त अनुक्रमे २२३ व १५४ विकेट्स त्याने घेतल्या आहेत. फलंदाजीतही त्याने प्रथम श्रेणीत १७९३ धावा केल्या आहेत.

टॅग्स :रणजी करंडकऑफ द फिल्ड