PHOTOS: 'रेड' अलर्ट! बॉलिवूडची 'सुंदरी' अन् प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी; अभिनेत्रीचा बोल्ड लूक

Geeta Basra: गीता बसरा मागील काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भज्जीने राजकीय इनिंग सुरू करत राजकारणात पाऊल ठेवले.

हरभजन सिंग हा आम आदमी पार्टीचा खासदार आहे. त्याला 'आप'ने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. हरभजनची पत्नी आणि अभिनेत्री गीता बसरा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. क्रिकेटपटूच्या पत्नीने आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

गीता बसराने लाल ड्रेसमध्ये बोल्ड फोटो पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले. तिच्या फोटोंवर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

गीता बसरा ही बॉलिवूडची अभिनेत्री आहे, पण तिला म्हणावी तशी आपली छाप सोडता आली नाही.

गीता मागील काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने २००६ मध्ये 'दिल दिया है'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२००७ मध्ये ती पुन्हा इमरान हाश्मीसोबत 'द ट्रेन'मध्ये झळकली होती. मात्र या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही.

२०१५ मध्ये हरभजन सिंग आणि गीता बसराने मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले आणि या दोघांना आता दोन मुली आहेत.