Cricket News Ravi Shastri : IPL आधी की देश?; रवी शास्त्रींनी स्पष्टच सांगितलं

Cricket News Ravi Shastri : टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup) भारताची कामगिरी निराशाजनक झाली आहे. अनेकांनी IPL स्पर्धेमुळे कामगिरीवर परिणाम झाल्याचं मतही व्यक्त केलंय.

Cricket News Ravi Shastri : टी-२० विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup Tream India) टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघ सुपर १२ टप्प्याच्या पुढे जाऊ शकला नाही.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या शक्यता जवळपास मावळल्या होत्या. जर तरचं गणितही भारतीय संघाच्या कामी आलं नाही.

भारताचा विश्वचषकातील प्रवास संपला तेव्हा संघाच्या निराशाजनक कामगिरीची बरीच चर्चा झाली आणि त्यासाठी आयपीएललाही (IPL) जबाबदार धरण्यात आले. भारतीय खेळाडू देशापेक्षा आयपीएलला जास्त महत्त्व देतात, अशी टीका भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही केली.

तेव्हापासून प्रसिद्ध टी-20 लीगमध्ये खेळणे जास्त महत्त्वाचे की मैदानात देशाची जर्सी घालणे, यावर वाद सुरू झाला आहे. आता याचे उत्तर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलं आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना रवी शास्त्री यांनी यावर भाष्य केलं.

"याबाबत कोणताही प्रश्नच निर्माण होत नाही. जर असं असतं तर गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी दिसलीच नसते. देशासाठी खेळताना तुमचं डोकं त्या ठिकाणी नसतं तर कोणात खेळाडून फ्रेन्चायझीला अधिक महत्त्व देईल," असं रवी शास्त्री म्हणाले.

"ते भारतासाठी खेळत आहेत. तुम्ही खुप नशीबान आहात. छातीवर बिल्ला असतो, इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशातून त्या अकरा खेळाडूंमधघ्ये सामील असता ज्यांना देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. जो असं काही बोलत असेल त्यासाठी माझ्याकडे वेळ नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय क्रिकेट संघाच्या ट्वेन्टी-२० संघाच्या नेतृत्त्वात आणि मुख्य प्रशिक्षपदाच्या बाबतीत आता मोठे बदल झाले आहेत. गेल्या ४ वर्षांपासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदाची जबाबदारी भूषवणाऱ्या रवी शास्त्री (Ravi Shatri) यांचा कार्यकाळ ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर संपला. याशिवाय गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघाचं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नेतृत्त्वा सांभाळण्याऱ्या विराट कोहलीनंही ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडलं आहे. कोहलीच्या जागी आता रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे.

कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्यामागे खरंच वर्कलोड मॅनेजमेंट हेच कारण होतं का? की रवी शास्त्री यांनाच संघाच्या प्रशिक्षपदी कायम ठेवावं या मागणीसाठी कोहलीनं राजीनामा दिला? असा प्रश्न शास्त्रींना विचारण्यात आला होता. "मला या दोघांपैकी एकही कारण योग्य वाटत नाही. ड्रेसिंग रुममध्ये कधी कधी एकमेकांमध्ये वाद होत असतात. तेव्हा तुमचं प्रत्येकाशी पटतंच असं नाही. मग तिथं मी किंवा कोहली देखील असू शकतो. अशावेळी एकाला पुढाकार घ्यावा लागतो. जेव्हा काही गोष्टी योग्य होत नसतात आणि त्याचा संघाला त्रास होऊ नये म्हणून एका व्यक्तीला पुढाकार घ्यावा लागतो. अशावेळी सर्वात चांगला मार्ग म्हणजे एकानं बाजूला होणं", असं शास्त्री म्हणाले.

तसंच "समजा माझ्यात आणि कोहलीमध्ये काही पटत नसेल तर यात जास्तकाळ अडकून न राहता संघाचा आणि भविष्याचा विचार करुन एकानं बाजूला हटणं योग्य असतं," असं उदाहरण देखील शास्त्रींनी यावेळी दिली. दरम्यान, शास्त्रींनी यावेळी संघातील कोणत्याही खेळाडूचं नाव या घेतलेलं नाही.

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी जो भारतीय संघ निवडला गेला त्या निवड प्रक्रियेत माझा आणि कर्णधार विराट कोहलीचा कोणताही सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा रवी शास्त्री यांनी केला आहे.

"मी संघ निवडीत सामील नव्हतोच. मी फक्त अंतिम ११ खेळाडू कोणते खेळवायचे या चर्चेचा भाग होतो. वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ निवड समितीनं निवडला होता. यात माझी किंवा अगदी कर्णधार विराट कोहलीची देखील सहमती घेण्यात आली नव्हती", असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

इतकंच नव्हे, तर सामन्यांच्या वेळापत्रकावरुन रवी शास्त्री यांनी जोरदार टीका केली. "मी कोणताही बहाणा करत नाही. पण सामन्यांचं वेळापत्रक आणखी चांगलं करता आलं असतं. तुम्ही बायो-बबलमध्ये आहात आणि पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध पराभूत झाल्यानंतर तब्बल आठवडाभर बसून राहता. सरावाला वेळ मिळतो ही गोष्ट बरोबर असली तरी यात दुखापतीचा देखील मोठा धोका असतो. त्यामुळे जास्त सराव करणंही योग्य नाही", असं रवी शास्त्री म्हणाले.

भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये रवी शास्त्री आणि कोहलीचा दादागिरीच्या आरोपावर देखील त्यांनी भाष्य केलं. "मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. ड्रेसिंग रुममध्ये काय वातावरण असतं हे माझं मला माहित आहे. लोक शक्यता आणि अंदाज व्यक्त करत असतात. लोक लिहू शकतात, पण संघ स्कोअरबोर्डवर किती धावसंख्या लिहीतोय हेच लोक लक्षात ठेवतात", असं रवी शास्त्री म्हणाले.