Join us  

सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील पाच वादग्रस्त क्षण, जे क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 5:26 PM

Open in App
1 / 6

सचिन तेंडुलकरवर बॉल टॅम्परिंग ( चेंडू कुरतडणे) चा आरोप केला गेला. होय हे खरं आहे. 2001च्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी सामन्यात सामनाधिकारी माईक डेन्नेस यांनी हा आरोप केला. तेंडुलकर चेंडूसोबत काहीतरी छेडछाड करत असल्याचं कॅमेरामननं कैद केलं. पण, तपासाअंती तेंडुलकर चेंडू साफ करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याची चूक एकच होती की त्यानं याबाबत मैदानावरील पंचांना काही कळवलं नाही. या चूकीबद्दल तेंडुलकरला मॅच फिमधील 75 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागली आणि एका सामन्याची बंदीची शिक्षाही झाली.

2 / 6

फॉर्म्युला वन मधील दिग्गज चालक मायकेल श्युमाकरनं 2001मध्येच तेंडुलकरला फेरारी 360 मोडेना गिफ्ट केली होती. पण, त्यावरील आयात कर वाचवण्यासाठी तेंडुलकरनं सरकारला विनंती केली होती. त्यावरून बराच वाद झाला होता. 2011मध्ये तेंडुलकरनं ही फेरारी सुरतच्या जयेश देसाईला विकली.

3 / 6

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2004मध्ये सचिन तेंडुलकनं कसोटीच्या दुसऱ्या दिवशी नाबाद 194 धावांवर खेळत होता. द्विशतकाच्या दिशेनं तो वाटचाल करत होता, परंतु कर्णधार राहुल द्रविडनं भारताचा डाव घोषित केला. तेव्हा तेंडुकरच्या चाहत्यांनी द्रविडवर टीका केली. तेव्हाही संघापेक्षा तेंडुलकरला वैयक्तिक शतक महत्त्वाची, अशी टीका झाली.

4 / 6

तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सर्वांनी ऐकले आहेत. पण, सच का सामना या कार्यक्रमात कांबळीनं सचिनवर आरोप केले होते. तेंडुलकर माझी कारकीर्द वाचवू शकला असता, पण त्यानं ते केलं नाही, असा आरोप कांबळीनं केला होता.

5 / 6

अँण्ड्य्रू सायमंड आणि हरभजन सिंग यांच्यातील मंकिगेट प्रकरण आजही सर्वांच्या लक्षात आहे. 2008मधील त्या घटनेनं क्रिकेट वर्तुळात खळबळ माजवली होती. सचिननं सुरुवातीला आपल्याला काहीच ऐकू आले नाही, असे सांगितले होते. पण, त्यानंतर त्यानं विधान बदललं. त्यानं सांगितलं की हरभजननं सायमंडला मंकी म्हटले नाही, तर तेरी मा की म्हणाला.

6 / 6

टॅग्स :सचिन तेंडुलकरहरभजन सिंग