Corona Virusच्या भीतीनं जग थांबलंय अन् इंग्लंडची क्रिकेटपटू भटकंती करतेय

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान माजवले आहे. आतापर्यंत जवळपास साडेपाच हजार लोकांना या व्हायरसमुळे प्राण गमवावे लागले आहेत. पण, या व्हायरसमधून तंदुरुस्ती होणाऱ्यांची संख्या ही ७९ हजारापर्यंत आहे.

सावधगीरी म्हणून लोकांना घरी राहण्याचे आणि WHOनं केलेल्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन केले जात आहे.

कोरोनामुळे क्रीडा विश्वावरही मोठा परिणाम जाणवलेलं पाहायला मिळत आहेत.

जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत आणि खेळाडूही घरीच राहण्यावर भर देत आहेत.

पण, इंग्लंडची महिला क्रिकेटपटू कोरोना व्हायरसचं टेंशन विसरून सध्या भटकंती करताना पाहायला मिळत आहे.

इंग्लंडची क्रिकेटपटू डॅनिएल वॅट न्यूझीलंडमध्ये भटकंती करायला गेली आहे. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीही आहेत

डॅनिएलनं तिच्या भटकंतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हॅमिल्टन येथून नंतर आपण ऑस्ट्रेलियात जाणार असल्याचंही तिनं सांगितलं असून तेथून लंडमध्ये परतणार आहे.

डॅनिएलनं 74 वन डे सामन्यांत 1028 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे.

109 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत तिनं 1588 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे.