Join us  

कोरोना संकटात IPL 2021 रद्द करणे हा उपाय नव्हे; ऑक्सिजनसाठी ३७ लाख देणाऱ्या पॅट कमिन्सचं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 8:15 AM

Open in App
1 / 5

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीन लाखांच्या घरात वाढत आहे. अशा परिस्थितीत आयपीएल २०२१ सुरू असल्यामुळे अनेकजण टीका करत आहेत. पण, आयपीएल बंद करणे हा कोरोना संकट रोखण्यासाठीचा उपाय नाही, असं स्पष्ट मत ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स यानं व्यक्त केलं.

2 / 5

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाज पॅक कमिन्सनं भारताच्या या कोरोना लढ्यात मदतीचा हातभार लावला. त्यानं पंतप्रधान फंडात ५० हजार डॉलर म्हणजे जवळपास ३७ लाख रुपये दान केले. ही रक्कम ऑक्सिजन खरेदीसाठी वापरण्यात यावी असं आवाहनही त्यानं केलं.

3 / 5

''आयपीएल रद्द करणे, हे कोरोना संकट रोखण्यावरचं उत्तर नाही. फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांवर कोणताही अधिकचा भार येणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आयपीएल रद्द करणे हा उपाय नाही.

4 / 5

''या संकटात प्रत्येक दिवशी सामना खेळून तीन-चार तास का होईना लोकांना घरी बसून ठेवतो, त्याचा कोरोना संसर्ग रोखण्यात थोडासा हातभारही लागत असावा. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो,''असे कमिन्स म्हणाला.

5 / 5

PM Cares Fund ला दान करण्याच्या निर्णयाबद्दल कमिन्स म्हणाला की,''कोलकाता नाईट रायडर्स संघातील सहकाऱ्यांशी चर्चा करताना हे समजलं की त्यांनी गेल्या वर्षी PM Cares Fundला मदत केली होती. संघाचा मालक व बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यानंही काही रक्कम दान केली होती. मदत करण्याचा हाच मार्ग होता आणि ती मी केली.''

टॅग्स :आयपीएल २०२१कोरोना वायरस बातम्याकोलकाता नाईट रायडर्स