नजर ना लागो! अभिषेक शर्माची 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' पुन्हा चर्चेत

कोण आहे ही सुंदरी? अन् भारत-पाक सामन्यातील अभिषेकच्या खेळीनंतर सोशल मीडियावर ती का आलीये चर्चेत जाणून घेऊयात सविस्तर

भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मानं पाकिस्तान विरुद्ध हिट शो दिल्यावर त्याची कथित गर्लफ्रेंड चर्चेत आली आहे.

अभिषेक शर्मानं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मॅच विनिंग खेळी केली. त्यानंतर लैला फैसल हिने युवा अँण्ड हँडमसम क्रिकेटरसाठी इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिषेक शर्मानं आपल्या टी-२० कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. लैला फैसल हिने युवा क्रिकेटरचे दोन फोटो शेअर करत तुझा अभिमान वाटतो, या खास कॅप्शनसह पोस्ट शेअर करताना नजर ना लागो...या इमोजीसह तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिषेक शर्मानं फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यावेळीही तिने क्रिकेटरवर प्रेमाची 'बरसात' केल्याचे पाहायला मिळाले होते. एवढेच नाही तर युवा क्रिकेटरला बर्थडे विश केल्यानंतरही ती चर्चेत आली होती.

अभिषेक शर्मा आणि लैला फसल बऱ्याच दिवसांपासून इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत आहेत. क्रिकेटरसाठी इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून खास पोस्ट शेअर करत असल्यामुळे दोघांच्यात प्रेमाचा खेळ सुरु असल्याची चर्चा रंगताना दिसते. दोघांनी यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.

लैला फैसल ही काश्मिरी मुस्लिम कुटुंबातील आहे. पण दिल्लीतच ती लहानाची मोठी झालीये. क्रिकेटरबद्दल पुन्हा एकदा 'दिवानगी' दाखवून देत अभिषेक शर्माची दिल्लीवाली गर्लफ्रेंड चर्चेत आल्याचे दिसते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला हा चेहला बिझनेस वुमच्या रुपातही ओळखला जातो. ती साउंड ऑफ म्युझिक लक्झरीची सीईओ आहे.

याशिवाय लैला फैसल हिने आईसोबत 'लैला रुही फैसल डिझाईन्स' नावाच्या कपड्यांचा ब्रँडही सुरु केला आहे.