भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही एक वर्षानं पुढे ढकलण्यात आली असून ती 2021मध्ये होईल.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमावरही अनिश्चिततेचं सावट कायम आहे. 14 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असली तरी त्यानंतर ती सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे.

अशात क्रीडापटूंना आपापल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे. काही खेळाडू व्हिडीओ कॉलद्वारे एकमेकांशी संवाद साधत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात खेळाडू आपल्या तंदुरुस्तीकडे जरा जास्तच भर देत आहेत.

पण, काही खेळाडू आपल्या जुन्या आठवणींत रमले आहेत. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवाल यानं त्याच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारानंही असाच एक बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्या कर्णधाराला ओळखणं भल्याभल्या क्रिेकेटतज्ज्ञांना जमणार नाही.

वन डे क्रिकेटमध्ये सलग 7 अर्धशतकं झळकावण्याचा विक्रम भारताच्या या कर्णधाराच्या नावावर आहे आणि तो अजूनही कोणालाही मोडता आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वप्रथम 2000 धावांचा पल्ला गाठणाऱ्या भारतीय खेळाडूचा विक्रमही या कर्णधाराच्या नावावर आहे.

चला अजूनही तुम्ही या कर्णधाराला ओळखलं नसाल तर आम्ही सांगतो. भारतीय महिला वन डे संघाची कर्णधार मिताली राजचा हा लहाणपणीचा फोटो आहे. तिनं तिच्या भावासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मितालीनं भारताकडून 10 कसोटी, 209 वन डे आणि 89 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. तिच्या नावावर एकूण 10 हजाराच्या आसपास आंतरराष्ट्रीय धावा आहेत.