"ना ते घर राहिलं; ना खऱ्या प्रेमाची भावना!" जुन्या आठवणींसह भावूक झाली धनश्री

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची गोष्ट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

एका बाजूला धनश्री आणि चहल यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगत असताना दोघेही या मुद्यावर मौन बाळगून आहेत. पण सोशल मीडियावरील पोस्टमधून ही जोडी एकमेकांच्यात बिनसल्याचे संकेत देताना दिसते.

यात आता धनश्री वर्माच्या आणखी एका पोस्टची भर पडलीये. डान्स कोरिओग्राफरनं भावूक पोस्ट लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे दिसते.

धनश्री वर्मानं लांबलचक पोस्टसह अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचे नागपूर शहरातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बालपणी आजोबा आणि आजीसोबत ज्या नागपूरस्थित घरात बहुंताश वेळ घालवला, त्या घरात असल्याचे स्वप्न पाहिले. पण जाग आली त्यावेळी कळलं की, ना आता आजोबा- आजी माझ्यासोबत आहेत ना ते घर. प्रामाणिकपणे सांगायचं तर आज मी खऱ्या प्रेमाची भावना मिस करतीये, असा उल्लेखही तिने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

आजोबा आणि आजी यांची काळजी घेणाऱ्या वीरेंद्र भैय्यांची भेट घेतल्याची गोष्टही धनश्रीने शेअर केली आहे.

आजोबा आणि आजीच्या मित्र मंडळींसोबतचे खास क्षण शेअर करत नागपूरकरांबद्दल मनात असणारे खास प्रेम तिच्या फ्रेममधून दिसून येते.

नागपूर शहरातील आठवणी अन् मित्र परिवाराचं प्रेम अवस्मरणीय आहे, असा उल्लेख तिनं आपल्या खास पोस्टमध्ये केल्याचे दिसून येते.