Jio Cinema अ‍ॅप लगेच डिलीट करा! IPL च्या तोंडावर मोठा गेम झाला, मॅच पहायची तर पैसे मोजावे लागणार

Jio Hotstar IPL Plan: रिलायन्स आणि डिस्ने हॉटस्टारमध्ये मोठी डील झाली आहे. यामध्ये दोन्ही प्लॅटफॉर्म एकाच जिओ हॉटस्टारवर एकत्र आले आहेत. गंमत अशी आहे की आता रिचार्ज मारावे लागणार आहे.

एक काळ असा आला होता, जिथे आयपीएल मॅच फुकटात पहायला मिळत होती. मुकेश अंबानींच्या जिओने आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले होते. भारतीय क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी डिस्ने हॉटस्टारवर मात करत विजयी बोली लावली होती. परंतू,आता समस्त क्रिकेटप्रेमींवर गेले ते फुकटात पहायचे दिवस, राहिल्या त्या आठवणी असे बोलायची वेळ आली आहे.

रिलायन्स आणि डिस्ने हॉटस्टारमध्ये मोठी डील झाली आहे. यामध्ये दोन्ही प्लॅटफॉर्म एकाच जिओ हॉटस्टारवर एकत्र आले आहेत. गंमत अशी आहे की आता रिचार्ज मारावे लागणार आहे. म्हणजे सबस्क्रीप्शन घ्यावे लागणार आहे. लोकांचा आयपीएल फुकटात पहायचा बेत फिस्कटल्यात जमा आहे. हॉटस्टार १० मिनिटे मॅच मोफत दाखवत होते. आताही तसेच असणार आहे, फक्त पूर्ण मॅच पहायची असेल तर रिचार्ज मारावे लागणार आहे.

म्हणजेच मुकेश अंबानींच्या खिशात थेट पैसा जाणार आहे. हे सबस्क्रीप्शन १४९ रुपयांपासून सुरु होणार आहे. दर महिन्याचे हे रिचार्ज करत रहावे लागणार आहे. जिओने २०२३ ला पाच वर्षांसाठी ३ अब्ज डॉलर्सची बोली लावत आयपीएलचे हक्क विकत घेतले होते. आता अंबानी हे पैसे असे वसूल करणार आहेत.

तुम्ही जिओ सिनेमावर पाहत असलेल्या वेब सिरीज किंवा अन्य काही जसेच्या तसे मध्यातून जिओ हॉटस्टारवर ट्रान्सफर होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुम्ही जो सध्या पाहत होता त्या पार्टवर जाण्याची गरज राहणार नाही. तुम्ही दोन्ही अॅपची सबस्क्रीप्शन घेतली असतील तर ती सुरुच राहणार आहेत.

जर तुम्ही हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन घेतले असेल तर त्यावर तुम्ही सिनेमाचा कंटेंटही पाहू शकणार आहात. अद्याप तरी हॉटस्टारच्या आधीच्याच सबस्क्रीप्शनच्या किंमती ठेवण्यात आलेल्या आहेत. भविष्यात त्या वाढण्याची शक्यता आहे.

कदाचित तुम्हाला जिओ सिनेमाचे सबस्क्रीप्शन बंद करावे लागण्याची शक्यता आहे. ज्यांनी पैसे भरलेत ते नॉन रिफंडेबल असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता जिओ सिनेमा अॅप तुमच्या मोबाईलवर ठेवण्याची गरज राहिलेली नाही. ते लगेच डिलीट करा.