Join us  

गुजरात टायटन्सचा फलंदाज अडकला लग्नबंधनात; धनश्री, अनुष्का यांच्यापेक्षा सुंदर दिसते त्याची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 4:37 PM

Open in App
1 / 7

डेव्हिड मिलरने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. त्याने रविवारी केपटाऊनमध्ये त्याची दीर्घकाळची मैत्रीण कॅमिला हॅरिससोबत लग्न केले.

2 / 7

मिलर आणि कॅमिला दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या लग्न सोहळ्याला कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.

3 / 7

कॅमिला हॅरिस एक खेळाडू म्हणून डेव्हिड मिलरच्या उंचीला उत्तम प्रकारे पूरक आहे, कारण कॅमिला स्वतः एक व्यावसायिक पोलो खेळाडू आहे. ती IPL 2023 मध्ये मिलर आणि गुजरात टायटन्सला चीअर करताना दिसली होती.

4 / 7

२०१९ मध्ये, तिने उद्योजकीय स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कॉर्पोरेटपद सोडले आणि तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी मिलरने Instagram वर कॅमिलाने लग्नाला होकार दिल्याचे सांगितले होते.

5 / 7

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा यांच्यापेक्षा कॅमिला सुंदर दिसते अशी चर्चा सुरू झाली आहे.

6 / 7

10 जून 1989 रोजी दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारिट्झबर्ग येथे जन्मलेल्या मिलरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास खरोखरच उल्लेखनीय राहिला आहे

7 / 7

ऑगस्ट २०२३ मध्ये, मिलरने झिम्बाब्वेच्या मपाला जेना येथील झाम्बेझी नदीच्या काठावर कॅमिलाला प्रपोज केले होते.

टॅग्स :आयपीएल २०२४गुजरात टायटन्सद. आफ्रिका