Join us  

CSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण

By स्वदेश घाणेकर | Published: September 22, 2020 7:15 PM

Open in App
1 / 11

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे. MS Dhoni आणि Steven Smith हे जगातील दोन सर्वोत्तम कर्णधारांचे नेतृत्व कौशल्य आज पाहायला मिळणार.

2 / 11

बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांच्या उपस्थितीत RR आज युवा खेळाडूंना संधी दिली आहे, तर CSK ने संघात एक बदल केला आहे. अंबाती रायुडू अनफिट असल्यानं त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे. महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

3 / 11

IPL 2020साठी झालेल्या लिलावात युवा खेळाडूंमध्ये सर्वांचे लक्ष वेधलेल्या मुळचा उत्तर प्रदेशचा, परंतु मुंबई कर्मभूमी असलेल्या यशस्वी जैस्वालने RRकडून IPLचे पहिले काँट्रॅक्ट मिळाले.

4 / 11

युवा खेळाडूंत यशस्वीनं सर्वाधिक भाव खाल्ला. यशस्वीला राजस्थान रॉयल्सनं 2.40 कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

5 / 11

यशस्वीच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याच्या यशाला मिळत असलेल्या लखलखाटामागे मनाला हेलावून टाकणारी दुसरी बाजू आहे.

6 / 11

तीन वर्ष यशस्वी तंबूत राहिला, पाणीपुरी विकली... क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यानं जे हाल सोसले, ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण, त्याचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

7 / 11

मुंबईच्या आझाद मैदान येथील मुस्लीम युनायटेड क्लबच्या तंबूत ग्राऊंड्समनसोबत यशस्वी तीन वर्ष राहिला. एका डेअरी शॉपमध्ये तो काम करायचा, परंतु क्रिकेट खेळून पार थकून जायचा. त्यामुळे काम करताना त्याला झोप यायची. त्यामुळे त्याला मालकानं कामावरून काढून टाकलं होतं.

8 / 11

फक्त एक यशस्वी क्रिकेटपटू बनायचंय हे एकच ध्येय उराशी बाळगून तो झटत राहिला. उत्तर प्रदेशातील भदोही गावातील हा युवा खेळाडू. त्याच्या वडिलांचं गावाकडं एक लहानस दुकान आहे. क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं मुंबई गाठली.

9 / 11

मुंबईत तो त्याच्या काकांकडे रहायचा, पण घर छोटं असल्यानं सर्वांना तेथे राहणे अवघड जायचे. त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली.

10 / 11

त्यानंतर यशस्वी क्लबच्या तंबूत तीन वर्ष राहिला. त्यानं हे त्याच्या घरच्यांना कधीच कळू दिले नाही. त्यांना कळले असते तर यशस्वीची क्रिकेट कारकिर्द तेथेच संपुष्टात आली असती.

11 / 11

त्याचे वडील मुंबईला पैसे पाठवायचे, परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून यशस्वी आझाद मैदान येथील राम लीला येथे पाणीपूरी व फळ विक्री करायचा. अनेकदा तर त्याला रिकामी पोटी झोपावं लागलं आहे. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं सर्वाधिक धावा केल्या होत्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो युवा खेळाडू.

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स