Join us  

Shocking : दक्षिण आफ्रिकेत 18 जुलैला होणार आगळावेगळा सामना; पण सहा जणांना कोरोनाची बाधा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 2:08 PM

Open in App
1 / 9

दक्षिण आफ्रिकेतही क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पण, हा क्रिकेट सामना थोडा वेगळा असेल, इथे तीन संघांमध्ये एक सामना होणार आहे.

2 / 9

या सामन्यात एबी डिव्हिलियर्स यांच्यासह आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर 18 जुलैला सामना होणार आहे.

3 / 9

किंग फिशर्स, क्विंटी काईट्स आणि एबी ईगल्स असे या संघांची नावं असून कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हिलियर्स हे या संघांचे नेतृत्व करणार आहेत.

4 / 9

Solidarity Cup असे या मॅचला नाव देण्यात आले आहे. प्रत्येक संघात 8 खेळाडूंचा समावेश असेल आणि 36 षटकांच्या सामन्यात प्रत्येक संघाला 12 षटकं खेळण्याची संधी दिली जाणार आहे.

5 / 9

एक संघ उर्वरित दोन संघांविरुद्ध 6-6 षटकांच्या ब्रेकसह 12 षटके फलंदाजी करेल. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल. पण, त्याची एकेरी धाव ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे त्याला केवळ दुहेरी धाव घ्यावी लागेल.

6 / 9

प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकतो. 12 षटकांत सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल.

7 / 9

विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक दिले जाईल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल.

8 / 9

या सामन्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडू, स्टाफ, प्रशिक्षक यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यापैकी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

9 / 9

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे, परंतु पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये एकाही खेळाडूचा समावेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :द. आफ्रिकाएबी डिव्हिलियर्स