राष्ट्रपती भवनात मास्टर ब्लास्टर सचिनचा सेल्फी अन् बरंच काही; इथं पहा खास फोटो

जाणून घ्या सचिन तेंडुलकरच्या राष्ट्रपती भवन दौऱ्यामागची खास गोष्ट

क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर याने नुकतीच राष्ट्रपती भवन येथे देशाच्या प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे राष्ट्रपती भवनातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तो नेमकं कोणत्या कारणासाठी इथं गेला होता असा प्रश्नही काही लोकांना पडला आहे.

या 'ग्रेट भेटी' दरम्यान सचिन तेंडुलरनं देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांना सही केलेली भारतीय टेस्ट जर्सी भेट स्वरुपात दिली.

सचिनसह त्याची पत्नी अंजली आणि लेक सारा तेंडुलकर यांनीही राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.

'राष्ट्रपती भवन विमर्श सीरीज' संमेलनाच्या खास कार्यक्रमात सचिन तेंडुलकरनं प्रमुख पाहुण्याच्या रुपात हजेरी लावली होती. त्याचे विचार ऐकण्यासाठी कार्यक्रमात लहान थोरांनी मोठी गर्दी केल्याचेही पाहायला मिळाले.

सचिन तेंडुलकरनं या कार्यक्रमात आपल्या क्रिकेट प्रवासातील काही खास किस्से शेअर करताना जीवन जगण्याचा दृष्टिकोन कसा असावा, यासंदर्भातील खास संदेशही दिला. अपयशानं खचू नका, शॉर्टकट मारण्याचा विचार अजिबात मनात आणू नका, असे तो म्हणाला.

कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थितीत असलेल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेण्याचा मोह देखील सचिनला आवरला नाही. कार्यक्रमातील हा सीन एकदम खासच आहे.

भविष्यात क्रीडा जगतात नाव कमावण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती. भावी खेळाडूंसाठी सचिननं साधलेला संवाद हा नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा असाच होता.