ऑस्ट्रेलियन संघासमोर कडवे आव्हान

जोहान्सबर्ग : याचाच फायदा घेत ऑस्ट्रेलिया संघाविरोधात मालिका विजयासाठी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मैदानात उतरणार आहेत. या मालिकेत दक्षिण आफ्रिका 2-1 ने आघाडीवर आहे.

जोहान्सबर्ग येथील वाँडर्स स्टेडियमवर ही लढत सुरू होणार आहे. या सामन्यात विक्रमी विजय मिळवून प्रमुख गोलंदाज मॉर्ने मॉर्केलला अविस्मरणीय निरोप देण्याचा निर्धारही आफ्रिकेच्या खेळाडूंनी केला आहे.

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी खेळाडूंना आधीच इशारा दिला आहे की, वॉर्नर,स्मिथ आणि बेनक्राफ्ट यांच्या शिवायदेखील ऑस्ट्रेलियन संघ कडवे आव्हान उभे करू शकतो.

चेंडू कुरतडल्याप्रकरणी संपूर्ण क्रिकेट विश्व ढवळून निघाले असून ऑस्ट्रेलियन क्रिकेटला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक डेरेन लेहमन यांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा आणि अंतिम कसोटी सामना हा त्यांचा अखेरचा सामना असेल. विशेष म्हणजे चेंडू कुरतडल्याप्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानंतरही त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.