Join us  

Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 12:09 PM

Open in App
1 / 14

कोरोना संकटात महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षी आणि आणि मुलगी जिवासोबत वेळ घालवत आहे. रांचीमध्ये धोनीचा 7 एकर परिसरात एक आलिशान फार्म हाऊस आहे.

2 / 14

कैलाशपती असं या फार्म हाऊसचं नाव आहे. महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसा निमित्तानं त्याच्या फार्म हाऊसचे खास फोटो पाहूया...

3 / 14

महेंद्र सिंग धोनी याचं फार्म हाऊस फारच आलिशान आहे. धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये नैसर्गिक सौंदर्याला अधिक महत्व दिलं आहे. टीम इंडियातील अनेक खेळाडूही इथे आल्यावर निसर्गाचा आनंद घेतात.

4 / 14

ज्या शहरात धोनी लहानाचा मोठा झाला, ज्या शहरात धोनी क्रिकट लिजेंड बनला त्याच शहरात त्याने हा आलिशान फार्म हाऊस तयार केला. रांचीमधील रिंग रोडवर हे फार्म हाऊस उभारण्यात आलं आहे.

5 / 14

हा भव्य फार्म हाऊस उभारण्यासाठी तीन वर्ष लागलीत. झाडांबाबत धोनीचं असलेलं प्रेम या फार्म हाऊसमध्ये बघायला मिळतं. या फार्म हाऊसमध्ये सगळ्याच गोष्टी भव्य आणि शाही आहेत.

6 / 14

या फार्म हाऊसमध्ये इंडोअर स्टेडिअम, स्वीमिंग पूल, प्रक्टीससाठी नेट मैदान, आधुनिक जिम आहे. हे फार्ण हाऊस धोनीच्या आधीच्या घरापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.

7 / 14

धोनीचं क्रिकेटमधील करिअर यशस्वी झाल्यानंतक त्याने आधीचं घर सोडून 2009 मध्ये हरमू रोडवर तीन मजली घर खरेदी केलं होतं. या घरात धोनी 8 वर्ष राहीला. 2017 मध्ये धोनी कैलाशपती फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाला.

8 / 14

धोनीने या फार्म हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. त्यासोबतच लाकडं आणि मार्बलचा या फार्म हाऊसमध्ये खूपच सुंदरतेने करण्यात आला आहे. धोनीसाठी इथे खास पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

9 / 14

इथे फारच सुंदर बाग तयार करण्यात आलीये. याच बागेत धोनी आपल्या श्वानांना ट्रेनिंग देत असतो.

10 / 14

धोनीने आपले सुरुवातीचे दिवस एका लहानशा घरात घालवलं होतं. आज तो जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये गणला जातो. पण हे सगळं मिळवण्यासाठी त्याला लांब प्रवास करावा लागला आहे.

11 / 14

12 / 14

13 / 14

14 / 14

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरांची