Join us

बॉलीवूडचे तलाकसत्र

बॉलीवूडमध्ये सध्या तलाकसत्र सुरू झाले की काय, असे वाटायला लागले आहे. मागच्या काही दिवसांत अनेक जोडप्यांनी एकमेकांपासून फारकत घेतली आहे.

By admin | Updated: January 21, 2016 02:23 IST

Open in App

बॉलीवूडमध्ये सध्या तलाकसत्र सुरू झाले की काय, असे वाटायला लागले आहे. मागच्या काही दिवसांत अनेक जोडप्यांनी एकमेकांपासून फारकत घेतली आहे. ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास करिश्मा कपूर - संजय कपूरचे देता येईल. गेल्या अकरा वर्षांपासून संसाराच्या बंधनात असलेल्या या जोडीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अभिषेक बच्चनसोबतचे लग्न तोडून दिल्लीतील उद्योगपती संजय कपूर याच्याशी संसार थाटण्याचा निर्णय करिश्माने घेतला होता, परंतु तिचा हा निर्णय चुकला. यांच्यातील वाद हा नेहमीच सार्वजनिक चर्चेचा विषय राहिला. संजय कपूरने आरोपाच्या फैरी झाडत करिश्माने निव्वळ पैशासाठी आपल्याशी लग्न केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे लग्न आता जवळ-जवळ तुटल्यात जमा आहे. अशा संसारिक वादळात बॉलीवूडमधील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.अनुराग कश्यप - कल्की कोचलिन अनुराग आणि कल्कीने बॉलीवूडला एक नव्हे तर दोन झटके दिले. पहिला जेव्हा त्यांनी लग्न केले अन् दुसरा जेव्हा त्यांनी एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे जाहीर केले. त्यांच्यातील नाते फार काळ टिकले नाही. त्यांच्या घटस्फोटाचे कारण हुमा कुरेशी असल्याचे बोलले जात होते.रणवीर शौरी - कोंकणा सेन शर्मा रणवीर आणि कोंकणा लिव इनमध्ये राहत होते. पुढे त्यांनी लग्नही केले. मात्र, जेव्हा कोंकणाच्या प्रेग्नंसीच्या बातम्या समोर आल्या, तेव्हा लागलीच त्यांच्या घटस्फोटाच्याही बातम्या रंगू लागल्या. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. नंतर रणवीरने मुलाची कस्टडी घेतली.

Open in App